जरगनगर जकात नाका येथे मंगळवारी रास्ता रोको आंदोलन
schedule11 Jul 22 person by visibility 1001 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.१२ जुलै) बाबा जरगनगर जकात नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
शिवस्वरूप नगर, पोस्टल कॉलनी, शेवंती पार्क, सावित्री चेंबर्स, साई कॉलनी,आंबेडकर नगर , आण्णाभाऊ साठे नगर, हरी पार्क , द्वारका नगर, राधाकृष्ण कॉलनी सुरम्य नगरी (आपटे मळा), सहजीवन सोसायटी रघुनाथ देसाई नगर, गणेश नगर, आरकेनगर मूळ व सहा नंबर सोसायटी परिसरातील नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. महापालिकेतर्फे या भागात पाणी पुरवठा होतो. मात्र गेले काही दिवस अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता आंदोलन होणार आहे.