खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे समाजभान, दिव्यांगांनी उत्पादित वस्तूंचे सभासदांना वाटप
schedule12 Oct 25 person by visibility 98 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेतर्फे यावर्षी सभासदांसाठी एक आगळीवेगळी दिवाळी भेट देऊन समाजभान जपले आहे पतसंस्थेने या दिवाळीला गोकुळच्या एक किलो तुपाबरोबर चेतना परिवारातील दिव्यांग मुलांनी दिवाळीसाठी बनवलेल्या वस्तूंचे कीट दिले.
पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे व चेअरमन मच्छिंद्र नाळे यांनी सांगितले की ,पतसंस्थेच्या माध्यमातून आकर्षक विविध योजना राबवल्या जातात पण यावर्षी पतसंस्थेने आपले वेगळेपण जपत शेंडापार्क येथील चेतना परिवारातील दिव्यांग मुलांनी बनवलेल्या साबण , उटणे , रंगीबेरंगी पणत्या , सुवासिक तेल , अगरबती व अत्तर या दिवाळी साठीच्या वस्तू विकत घेऊन त्याचे किट बनवून सर्व सभासदांना दिवाळी भेट दिले आहे .केवळ दिव्यांग मुलांनी हस्तकौशल्यातून तयार केलेल्या वस्तूंची विक्री व्हावी या उदात हेतूने संस्थेने हे पाऊल उचललेले असून यासाठी चेतना परिवार व आपल्या पतसंस्थेचा लोगो असलेली पिशवीही तयार करून त्यातून ही भेट दिली आहे.
या उपक्रमासाठी व्हाइस चेअरमन कृष्णात चौगले, सचिव वर्षाराणी वायदंडे, संचालक माधुरी घाटगे, सूर्यकांत बरगे,सर्जेराव नाईक ,शिवाजी सोनाळकर, साताप्पा कासार, वसंत पाटील, राजेश कोंडेकर, महादेव डावरे, अमित परीट ,रोहिणी यडगे, संतोष आयरे, राजेंद्र कोरे व कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांचे सहकार्य लाभले.