…तरच चंदेरी दुनियेत या ! अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनी साधला तरुणाईशी संवाद
schedule12 Oct 25 person by visibility 112 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘तुमच्यात धमक असेल, इच्छाशक्ती असेल आणि एखादं कौशल्य असेल, तर चंदेरी दुनियेत अवश्य या,” असे मत अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी दिला. ते केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त प्रदत्त) महाविद्यालयात येथे आयोजित ‘अभिग्यान पूर्वरंग सोहळा २०२५’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमात येत्या ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ‘अभिग्यान’ महोत्सवाच्या १३ व्या पर्वासाठी ४ मान्यवर पाहुण्यांची घोषणा करण्यात आली. यावर्षीच्या अभिग्यान कार्यक्रमासाठी ‘क्विक हिल’ चे संजय काटकर,सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग, प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आणि एआयतज्ञ चिन्मय गव्हाणकर हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांची प्रा.प्रमोद पाटील यांनी मुलाखत घेतली. या संवादात त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास, कलाक्षेत्रातील अनुभव, तसेच तरुणाईसाठी ऊर्जा आणि प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाने आणि विनोदी शैलीने रंगलेल्या या मुलाखतीत ‘रॅपिड फायर राउंड’ ने कार्यक्रमाला अधिक रंगत आणली. केआयटीचे उपाध्यक्ष उद्योजक सचिन मेनन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सचिन मेनन यांनी या अभिग्यान या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान,सामाजिक,उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सकारात्मक व्यक्तींची ओळख व त्यांचे विचार पोहोचवले जातात अशा प्रकारच्या आशयाचे मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी आणि माजी विद्यार्थी व उद्योजक चेतन नरके उपस्थित होते. शिवेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. संयम पाटील आणि अंकिता गिड्डे यांनी सूत्रसंचालन केले. आदित्य साळुंखे आणि समीक्षा बुधले यांनीआभार मानले. अभिग्यान समन्वयक प्रा.अमर टिकोळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. अभिग्यान सह-समन्वयक प्रा.प्रसाद जाधव यांनी ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अभिग्यान २०२५ मधील पाहुण्यांची ओळख करून दिली.