डीवाय पाटील अभियांत्रिकीमध्ये करिअर डेव्हलपमेंट -प्लेसमेंट सेल
schedule11 Oct 25 person by visibility 62 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन : डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त करिअर डेव्हलपमेंट, प्लेसमेंट आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन उभारण्यात आलेल्या या विभागात १२४ विद्यार्थ्यांची क्षमता असलेली उच्च तंत्रज्ञानयुक्त कॉम्प्युटर लॅब, १२० आसनी वातानुकूलित सेमिनार हॉल, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित चार मुलाखत कक्ष अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम बनविणे हे आमचे ध्येय आहे. या नव्या विभाग्तील आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी भक्कम व्यासपीठ ठरतील. उद्योगजगताच्या बदलत्या गरजेनुसार विद्यार्थ्याना नवनवीन ज्ञान व प्रशिक्षण देऊन त्यांना परिपूर्ण बनविण्यासाठी आमची संस्था नेहमी एक पाऊल पुढे राहते. ऋतुराज पाटील म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या कंपनीमध्ये उत्तम नोकरी मिळावी यासाठी आमची टीम नेहमीच प्रयत्नशील असते. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, या अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उपयुक्त ठरतील. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे कौशल्य अधिक विकसित होईल. त्यांना अधिक चांगल्या करीअर संधी उपलब्ध होतील.
यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, डॉ. महादेव नरके, डॉ. अजित पाटील, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार उपस्थित होते.