महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे व विवेक चंदालिया यांचा शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी नागरी सत्कार आयोजित केला आहे. विविध संस्था, संघटना यांनी संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्या दोन्ही शिक्षकांचा सत्कार होणार आहे. याप्रसंगी आरजे मनिष आपटे हे सत्कारमूर्तीची मुलाखत घेणार आहेत. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात सायंकाळी चार वाजून ५९ मिनिटाला हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.