एनएमएमएस परीक्षेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल, १७०३ विद्यार्थी गुणवत्ता यादी
schedule04 Apr 25 person by visibility 1916 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्र सरकारमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या निकालात कोल्हापूर जिल्हयाने यशाची परपंरा कायम राखली आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची परीक्षा २२ डिसेंबर २०२४ मध्ये झाली होती. जिल्ह्यातील एकूण ७२ केंद्रावर २७ हजार ४३७ इतके विद्यार्थी प्रविष्ठ होते।
जिल्ह्याचा कोटा ४३७ असताना १७०३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. राज्यात अव्वल येण्याची परंपरा शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षण विभागाने कायम राखली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून लोकसहभागातून घेतली जाणारी सराव चाचणी मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक ,माध्यमिक शिक्षण विभागाचे नियोजन यामुळे १७०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. सुमारे बारा हजार विद्यार्थी राज्य सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याला दरवर्षी बारा हजार रुपये रुपये पुढील चार वर्षे व सारथी शिष्यवृत्तीला पात्र होणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी ९६०० रुपयेप्रमाणे पुढील चार वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक प्रथम तीन क्रमांकाच्या शाळांचे अभिनंदन करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप शिक्षणाधिकारी आंबेकर यांनी केले. शिवाय उपशिक्षणाधिकारी गजानन उकिरडे, दिगंबर मोरे,अजय पाटील, विस्तार अधिकारी धनाजी पाटील, जयश्री जाधव, डॉ विश्वास सुतार ,डी सी कुंभार, रत्नप्रभा दबडे यांच्यामार्फत मुख्याध्यापक सहविचार सभा आयोजित करून संबंधितांचे अभिनंदन केले जात आहे.