Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकरचे क्रीडा स्पर्धेत यश जोतिबा यात्रेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे औषधांचे मोफत वाटपसेवक संघाच्या अध्यक्षपदी मिलिंद भोसलेंची फेरनिवड, दोन तास सदस्यांत रंगली चर्चा !जिल्हा परिषद महिला सदस्याचे गंठण चोरटयांनी लांबविले, कसबा बावड्यातील प्रकारकोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ गिरीष फोंडेंवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या ! महापालिकेवर मूक मोर्चा, जोरदार निदर्शने !! शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल साळोखे, उपाध्यक्षपदी विजय इंगवले मुख्याध्यापकांनीच मागितली लाच, पोलिसांनी रंगेहाथ पकडलेदूध उत्पादकांची चांदी, कर्मचाऱ्यांना दोन टक्के जादा बोनसशाखा अभियंता हुपरेंना कारणे दाखवा नोटीस, गायब पाण्याच्या टाक्यांची चौकशी सुरू

जाहिरात

 

उद्योजकतेचे रोपटे तरुणाईत रुजवण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची- श्रीनिवास चेटलापल्ली

schedule10 Apr 25 person by visibility 134 categoryशैक्षणिक

केआयटीमध्ये प्राध्यापकांसाठी इनोव्हेशन व उद्योजकता विषयावर कार्यशाळा,
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘उद्योजकतेचे रोपटे जीवनात रुजवण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असते.’असे मत टेक महिंद्राच्या इनोव्हेशन विभागाचे प्रमुख श्रीनिवास चेटलापल्ली यांनी व्यक्त केले.

केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) व शिक्षण मंत्रालयाच्या इनोवेशन सेल तसेच केआयटी कॉलेज व केआयटीच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील प्राध्यापकांसाठी ‘इनोव्हेशन व उद्योजकता’ या विषयावर ५ दिवसाची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेत ३८ महाविद्यालयातील ५० हून अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

नर्मदा मॅनेजमेंटचे मुख्य सल्लागार रणधीर पटवर्धन यांनी समस्यांपासून शक्यतांकडे या विषयावर मार्गदर्शन केले. आयआयटी धारवाड रिसर्च पार्कचे मुख्य अधिकारी रक्षित कल्याणी यांनी सृजनशीलता आणि आयडिया जनरेशन याबाबत मार्गदर्शन केले. महिंद्रा युनिव्हर्सिटी हैदराबादचे इस्माईल अकबानी, सुधीर आरळी, पार्थ हजारे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. इंडोवेशन सेंटर मुंबई चे व्यवस्थापक उमेश राठोड, यशांग गोकाणी, अपेक्सचे सहसंस्थापक सचिन कुंभोजे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. केआयटी चे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी प्रेरणा, अभ्यासक्रमात उद्योजकतेचा अंतर्भाव यासंबंधी मार्गदर्शन केले.

ईवोल्व्हिन्ग एक्स,पुणेचे संस्थापक अमोल निटवे यांनी प्रभावी मेन्टोरिंग  या विषयावर प्रभावी संवाद साधला. स्टार्टअप लाइफ स्टाईल हब पुणेचे अर्जुन पांचाळ, ऍक्युअर्स आयपी केअरचे डॉ.अविनाश ठाकूर, केआयटी आयआरएफ चे इनक्युबॅशन मॅनेजर देवेंद्र पाठक, अंजोरी कुंभोजे यांनी मार्गदर्शन केले.  कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा विदुला वास्कर पाटील यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन,  सचिव दीपक चौगुले यांचे विशेष प्रोत्साहन या कार्यशाळेच्या नियोजनासाठी मिळाले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes