कोल्हापूर सर्किट बेंचचा शिक्षकासाठी मोठा निर्णय, अशैक्षणिक कामे नाकारल्यास कारवाई नको
schedule04 Sep 25 person by visibility 2767 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने शिक्षकासाठी एक मोठा निर्णय आहे. अशैक्षणिक कामे नाकारणाऱ्या शिक्षकावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करू नका असा आदेश दिला आहे. कोल्हापूर महापालिकेने महापालिका शाळा खाजगी शाळा व माध्यमिक शाळेतील 450 हुन अधिक शिक्षकांना घरगुती गणपती विसर्जन व सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या दिनी कामे सोपी होती या विरोधात शिक्षक संघटनाने एकत्र येऊन सर्किट बँक मध्ये याचिका दाखल केली होती त्यावर सर्किट बँक हा आदेश दिला आहे. तसेच अशैक्षणिक कामाच्या याचिकेबाबत 23 सप्टेंबर 2025 रोजी सर्वंकष मुद्द्यावर म्हणणे एकूण अंतिम निर्णय देऊन हा विषय निकाली काढण्याचे सूतोवाचही कोर्टाने दिले आहे.
बुधवारी दिलेल्या सर्किट बेंच या आदेशानंतर कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. " हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निर्णयाचे आम्ही सर्व शिक्षक स्वागत करतो. सततच्या अशैक्षणिक कामातून सुटका होण्याचा महाराष्ट्राला दिशादर्शक असणारा न्याय आम्हाला मिळेल व मुलांच्या अध्यापनासाठी शिक्षकांना अधिक वेळ मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो " असे मत शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे, आयफेटोचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत, शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाचे शहराध्यक्ष दिलीप माने, खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे नेते संतोष आयरे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे यांनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद झाली
भरत रसाळे म्हणाले, न्यायमूर्ती एम एस कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी गणेश विसर्जन कामगिरीवर बहिष्कार टाकलेल्या शिक्षकावर कोणतीही कारवाई करू नका असा आदेश महापालिकेला दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किटमध्ये अशैक्षणिक कामाच्या अनुषंगाने दिलेला हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा आहे.
सुधाकर सावंत म्हणाले, मागील वर्षी शिक्षकाने आम्हाला शिकवू द्या म्हणून हजारोंचे मोर्चे काढले. त्याचा परिणाम म्हणून 23 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने शिक्षकाने कामे कोणती व अशैक्षणिक कामे कोणती यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तरीही विविध कारणे सांगून शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारची अशैक्षणिक कामे लावली जातात. सर्किट बेंचच्या या निर्णयामुळे शिक्षकांना लावण्यात येणाऱी अशैक्षणिक कामे आता बंद होतील.
शिक्षक संघाचे शहराध्यक्ष दिलीप माने म्हणाले, समाजभान असलेला समाजातील एक प्रमुख घटक म्हणून व महापालिकेला सहकार्य म्हणून सार्वजनिक गणपती विसर्जना दिवशी अनेक शिक्षक स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. मात्र हे काम हे स्वईच्छेचे आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावू नका कोर्टाचा हा आदेश शिक्षक,विद्यार्थी व शाळेसाठी खूप मोलाचा ठरणार आहे.
दरम्यान गणेशोत्सवाची कामे नाकारणाऱ्या शिक्षकावर राष्ट्रीय आपत्ती अधिनियम अंतर्गत कारवाई केली जाईल असा आदेश महापालिकेने काढला होता. मात्र गणेश उत्सवाचे काम हे राष्ट्रीय आपत्तीमध्ये समाविष्ट होत नाही तेव्हा शिक्षकांना अशा प्रकारची कामे कशी लावू शकता असा सवाल कोर्टाने महापालिकेला केला होता अशी माहिती वकील आदित्य रक्ताडे यांनी दिली. तसेच महापालिकेला या प्रश्नी शिक्षकांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले पत्रकार परिषदेला शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई , शिक्षक संघ थोरात गटाच्या शहराध्यक्ष जयश्री कांबळे, जुन्या पेन्शन संघटनेचे अध्यक्ष किरण पाडळकर, खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यसचिव शिवाजीराव भोसले, संजय पाटील, दस्तगीर मुजावर, अमित जाधव, संजय कडगावे आदी उपस्थित होते