खंडपीठासाठी करवीरनिवासिनी अंबाबाईला साकडे, पंढरपुरातून रथयात्रा
schedule04 Apr 25 person by visibility 39 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे याकरिता करवीर निवासिनी अंबाबाई देवीला खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी साकडे घातले.तर पंढरपूर येथील बार असोसिएशनतर्फे विठ्ठल मंदिरात अभिषेक घालून रथयात्रेला सुरुवात झाली.
शुक्रवारी, सकाळी ८.३० वाजता करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. सर्जेराव खोत, सचिव निशिकांत पाटोळे, सहसचिव राजू ओतारी, कर्णकुमार पाटील कार्यकारिणी सदस्य सागर घोरपडे, चंद्रकांत कुरणे यांनी अंबाबाई देवीस अभिषेक केला. याप्रसंगी सोनाली शेठ स्नेहलता सावंत, सरिता घोरपडे, रोहिणी भोसले, गीता इंगळे, कोल्हापूर फर्स्टचे समन्यवक सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशनचे बाबा कोंडेकर कागल हातकणंगले मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे मोहन कुशिरे हे उपस्थित होते करवीर निवासिनीच्या कोल्हापूर दरबारी सत्याचा न्याय निवाडा व्हावा याकरिता खंडपीठ मंजूर व्हावे असे जगदंबेला साकडे घालण्यात आले.
पंढरपूर बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष राजेश चौगुले, उपाध्यक्ष महेश कसबे, सचिव अभयसिंह देशमुख तसेच सांगोला बार असोसिएशनचे अध्यक्ष मारुती ढाळे, मंगळवेढा बारचे अध्यक्ष राजू शेख आणि माळशिरस बार असोसिएशनच्या अध्यक्षा सुहासिनी देव यांनी पंढरपूर येथील विठृठल मंदिरात दर्शन घेऊन रथयात्रेला सुरुवात केली. विविध जिल्ह्यातून ही रथयात्रा दुपारी चार वाजता कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन येथे पोहोचली खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव खोत यांचे हस्ते व खंडपीठ कृती समितीचे सन्माननीय सदस्य संभाजीराव मोहिते यांच्या हस्ते श्री विठ्ठल मूर्तीस हार घालून स्वागत करण्यात आले. सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण रजपूत उपस्थित हाते. सांगोला बार असोसिएशनच्या सदस्या श्रीमती अश्विनी मोहिते यांनी आभार मानले.