काँग्रेस घेणार प्रत्येक जिल्हयाचा आढावा, पुणे जिल्हयाच्या निरीक्षकपदी सतेज पाटील
schedule04 Apr 25 person by visibility 54 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्याकडे पक्षाकडून नवीन जबाबदारी सोपविली आहे. पुणे शहर व जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनुसार सर्व जिल्ह्यात पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती होत आहे. आमदार पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पंधरा दिवसात प्रदेश कार्यालयाला अहवाल सादर करावयाचा आहे. यासंदर्भातील माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.