वीज कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांची महापारेषणच्या एमडीसोबत बैठक
schedule04 Apr 25 person by visibility 32 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यावतीने महापारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्यासोबत विविध विषयासंबंधी बैठक पार पडली.
मानव संसाधन विभागाचे संचालक सुगत गमरे यांच्यासोबत त्यांनी तातडीने बैठक आयोजित करून दिली असता या बैठकीत कंत्राटी कामगारांचे कंत्राटदारांकडून होणारे आर्थिक शोषण रोखण्यासाठी यंत्रणा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महापारेषण कंपनीत कार्यरत कंत्राटी कामगारांना प्रत्येक भरती मध्ये जादा दहा गुण दिले जातील व त्यांना वितरण कंपनी प्रमाणे वयोमर्यादा ४३ वर्षा पर्यंत केली जाईल. १९ टक्के वेतनातील फरकाची रक्कम लवकर दिली जाईल, असे आश्वासन मिळाले.यावेळी महापारेषण कंपनीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील देखील उपस्थित होते
या बैठकीस संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक अण्णाजी देसाई, अध्यक्ष निलेश खरात, कार्याध्यक्ष अमर लोहार, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटनमंत्री उमेश आणेराव, तसेच वायरमन ट्रेड प्रतिनिधी शुभम राठोड (यवतमाळ) आणि उमाकांत गिरी (अहिल्यानगर) व कल्याण झोन अध्यक्ष मनोज मनोचारी उपस्थित होते.लवकरच या विषयासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी संगितले.संघटनेतर्फे इतर २२ राज्यांतील पारेषण कंपन्यांचा तुलनात्मक अभ्यास अहवाल व केंद्र सरकारच्या विविध परिपत्रकांचा अभ्यास अहवाल कंपनीकडे सादर करणार असल्याचे कार्याध्यक्ष अमर लोहार यांनी कळवले.