अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन -सतीशचंद्र कांबळे
schedule04 Apr 25 person by visibility 38 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे निवेदन सादर केले. उन्हाळ्यातील कामकाजाच्या वेळेत बदल, प्रोत्साहन भत्त्याची त्वरित अंमलबजावणी, थकबाकी भरपाई आणि अन्य महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या.कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल असे कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी म्हटले आहे.
कॉम्रेड कांबळे म्हणाले, ‘अंगणवाडी सेविकांना ऑक्टोबर २०२४ पासून प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. या थकबाकीमुळे अनेक सेविका आर्थिक अडचणीत आल्या आहेत. हा भत्ता लवकर मिळाल्यास सेविकांना आत्मविश्वासाने काम करता येईल., ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सेविकांना मानधन मिळावे.’
संघटनेच्या सचिव कॉम्रेड शुभांगी पाटील यांनी, अंगणवाडी सेविकांना आणि मुलांना शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे उन्हाळी सुट्टी मिळावी, अशी मागणी केली. उन्हाळ्यात ताज्या अन्नाऐवजी मुलांसाठी कोरड्या खाऊची व्यवस्था करावी, जेणेकरून पोषणक्रम अखंडित राहील आणि अन्नाच्या दर्जावरही परिणाम होणार नाही.’असे त्या म्हणाल्या. यावेळी दिलदार मुजावर, उत्कर्ष पोवार, भारती चव्हाण, जयश्री पवार, आनंदी कांबळे, शकुंतला कोळी, प्रिया खाडे, ज्योती पाटील, सुवर्णा काटकर, रूपाली महे, कल्पना सातपुते, भारती बाटे, वैशाली कुंभार, मंदा साळुंखे, मीना पवार,रेखा पाटील, भारती दुर्गुळे, शोभा कांबळे, छाया सातपुते, शुभांगी खांडेकर, सीमा कांबळे, संगीता पाटील, रेश्मा लोहार उपस्थित होते.