चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल, दिलबहार तालीम मंडळ विजयी
schedule04 Apr 25 person by visibility 45 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत "चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारच्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळ व दिलबहार तालीम मंडळ (अ) यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला.
सामन्याची सुरुवात संजय शहा, कमलाकर जगदाळे, अनिरुद्ध भुरके, सागर गायकवाड, बाबुराव पाटील, प्रमोद भोसले, संजय पवार, रविकिरण गवळी, रवी शिंदे, सुनील कानूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळने प्रॅक्टिस क्लबचा ३-१ असा पराभव केला. पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बालगोपाल संघाच्या सिगनेट जॉर्जची निवड झाली. दिलबहार तालीम मंडळ (अ) विरुद्ध सुभाषनगर स्पोर्ट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिलबहार तालीम मंडळांने (अ) सुभाषनगर स्पोर्ट्सचा ३-०ने पराभव करून, पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून श्री दिलबहारच्या प्रथम भोसलेची निवड झाली. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.