पदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठ शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलन - प्रसाद पाटील
schedule13 Jun 26 person by visibility 10 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : टीईटी व सीटीईटी उत्तीर्ण असलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत डावलण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व संघटनांच्या साथीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल आशा इशारा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला.
धुळे येथे सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 नुसार कोणतेही पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांच्या पदोन्नती या सेवाजेष्ठतेने घेण्याचे आदेश असताना एक सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना प्रथम पदोन्नती देण्याचा शासनाने घातलेला घाट शासनाने दुर्देवी असून टीईटी उत्तीर्ण असलेल्या सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्यायकारक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास धुळे महानगर पालिका उपमाहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती पोतदार, उपशिक्षणाधिकारी डी एस सोनवणे, संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, महिला अध्यक्षा सुरेखा बोरसे, रुकमा पाटील, रविंद्र देवरे, किरण चौधरी, के. एस. पाटील, ऋषिकेश कापडे, प्रशांत महाले, न्हानू माळी, दीपा मोरे, प्रतिभा उपस्थित होते.