कोल्हापुरात तेरा जूनपासून एक दिवस आड पाणी पुरवठा
schedule12 Jun 26 person by visibility 22 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी कमी झाल्यामुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात शनिवारी, १३ जून २०२६ पासून एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यासंबंधी नियोजन केले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापौर रुपाराणी निकम, आयुक्त राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा बंद झाल्याने या योजनेतून शहराला पाणीपुरवठा करणे सध्या शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी येथील पंपिंग
स्टेशनमधून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. आगामी पावसाची शक्यता तसेच पंचगंगा नदीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन या तिन्ही पंपिंग स्टेशनच्या क्षमतेनुसार पाणी उपसा करण्यात येणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन व काटकसरीने व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर शहर तसेच संलग्न उपनगरांमध्ये दि. १३ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पुईखडी फिल्टर हाऊसवरुन तेरा जूनपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणारा भाग संपूर्ण राजरामपुरी व एक्सटेंशन परिसर, मातंग वसाहत, राजेंद्रनगर, वैभव टेकडी, ग्रीनपार्क, रेव्हेन्यू सोसा, सम्राटनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी, कावळा नाका, टाकाळा, शिवाजी पार्क, शाहुपूरी, व्यापारी पेठ पहिली ते चौथी गल्ली, साईक्स एक्सटेंशन असा आहे. कसबा बावडा फिल्टर हाऊसवरुन शनिवारपासून एक दिवस आड पाणी पुरवठा होणाऱ्या भागात भगवा चौक, संपूर्ण बावडा, मधुमालती कॉलनी, डी. वाय. पाटील रोड, बिरंजे पाणंद, कदमवाडी, चौगले गल्ली, उलपे मळा, कनाननगर, पोवार मळा, रमण मळा, न्यू पॅलेस, धैर्यप्रसाद, कारंडे मळा, सर्किट हाऊस, ताराबाई पार्क, लाईनबाजार, सदर बाजार, विचारे माळ इत्यादी
या भागाचा समावेश आहे.
रविवार १४ जूनपासून पुईखडी फिल्टर हाऊसवरुन एक दिवस आड पाणी पुरवठा होणाऱ्या भागात जवाहरनगर, सुभाषनगर, वायपी पोवार नगर, एस.एस.सी.बोर्ड, मनोरा हॉटेल, जिवबानाना, बापूरामगर, नविन वाशी नाका, सांळुखे नगर, संभाजीनगर, मोरे माने नगर, कळंबा फिल्टर हाऊस, तपोवन, पाचगांव,जरगरनगर, वारेवसाहत, शिवाजीपेठ, मंगळवार पेठ, आयसोलेशन या भागाचा समावेश आहे. तसेच रविवारपासून कसबा बावडा फिल्टर हाऊसवरुन एक दिवस आड पाणी पुरवठा कावळानाका, टेंबलाईवाडी,स्टेशन रोड, बापट कँप,लोणार वसाहत,रुईकर कॉलनी,रुक्मीणी नगर, मार्केट यार्ड, लिशा हॉटेल, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, बाबर हॉस्पीटल, शिवाजी पार्क या भागात होणार आहे.