Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कृष्णराज महाडिकांना चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा !  सामाजिक उपक्रमांची जोड अन् कार्यकर्त्यांचा उत्साह  !!कोल्हापुरात तेरा जूनपासून एक दिवस आड पाणी पुरवठाकोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश कोकाटेशाळा प्रवेशोत्सव ठरणार प्रेरणादायी ! मंत्री - खासदार- आमदार - अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत !!कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाबद्दल सामाजिक उपक्रमपवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीस मुदतवाढ मिळावी - भरत रसाळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार - मंत्री हसन मुश्रीफ       अमित शहांची होणार कोल्हापुरात जाहीर सभा ! दोन दिवसीय दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम!!गोकुळचे एमडी योगेश गोडबोले यांच्यावर मोठी जबाबदारी, राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधीज्यांच्यासाठी बाग, त्यांच्याच हस्ते उद्घाटन;  लोकार्पणाचा मान चिमुकल्यांना

जाहिरात

 

कृष्णराज महाडिकांना चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा !  सामाजिक उपक्रमांची जोड अन् कार्यकर्त्यांचा उत्साह  !!

schedule12 Jun 26 person by visibility 34 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. युवा मोर्चा व विविध संस्था, संघटनांनी सामाजिक उपक्रम करत महाडिक यांचा वाढदिवस साजरा केला. मंत्री चंद्रकांत पाटींल, महापौर रुपारणी निकम यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, राजकीय कार्यकर्ते व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी शिये करुणालय संस्थेतील एचआयव्हीग्रस्त मुलांना खाऊचे वाटप केले. पांजरपोळ संस्थेतील जनावरांना एक ट्रॉली फळे, भाजी, दोन ट्रॉली चारा दिला. सीपीआर चौकात कोल्हापुरी थाळीच्या माध्यमातून अन्नदान, फिरस्त्यांना छत्र्या वाटप आणि नशामुक्त भारत अभियानाला बळ देण्यासाठी मिरजकर तिकटी येथे दूध वाटप उपक्रम राबवण्यात आला.  करवीर तालुक्यातील शिये भाजपा पदाधिकार्यांच्यावतीने दिव्यांगांसाठी व्हिल चेअर आणि स्टीक आणि अन्य साहित्य देण्यात आले. भागरीथी महिला संस्थेच्या कार्यालयात हे साहित्य प्रदान करण्यात आले. पांजरपोळ संस्थेतील जनावरांना दोन ट्रॉली चारा देण्यात आला. तसेच किरण शिराळे फौंडेशन आणि श्रीराम युवा प्रतिष्ठानच्यावतीने १०० कलिंगडे, २५ डझन अननस, ३० डझन केळी असे खाद्य, सिध्दार्थ शिराळे, वैभव राऊत, ओंकार म्हेतर, अथर्व जाधव, सिध्दांत जिरगे, शिवतेज देसाई, गौरव सरनाईक, तनिष्क पुरवंत, विवेक पाटील यांच्यामार्फत जनावरांना खाऊ घालण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी गोरक्षणाची शपथ घेतली.
दरम्यान श्री गायत्री सेवाभावी  संस्थेच्या सुचित हिरेमठ, श्रीधर पाटील, शंभूराज पाटील, निखिल माने, निलेश खरबडे यांनी जनावरांना चारा दिला. कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून उदय प्रभावळे यांच्या अन्नदान उपक्रमाला कार्यकर्त्यांनी बळ दिले. सीपीआर चौकात या परिसरातील रुग्णांचे नातेवाईक तसेच फिरस्ते आणि भुकेल्यांना अन्नदान करण्यात आले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत पवार, सरचिटणीस वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश पाटील- घरपणकर, भुषण कानकेकर, अभिषेक भोसले, तलहा मणेर, रोहित कारंडे, देवयानी पाटील, पृथ्वीराज पुरोहित, अनिरूध्द भुर्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित

शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी

भाजप कार्यालयात कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मंत्री चंद्रकांत  पाटील, महापौर रुपाराणी निकम यांनी शुभेच्छा दिल्या. स्थायी समिती सभापती विशाल शिराळे,  राहुल चिकोडे, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, सुनील वाडकर, प्रिया तेंडुलकर, माधुरी व्हटकर, अभिजित खतकर, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावर्डेकर, नामदेव वाईंगडे, हैबतराव नाईक-निंबाळकर यांच्यासह चंद्रकांत संकपाळ, तानाजी फाले, बाबा जांभळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजीराव पाटील, उत्तम बांडागळे, डॉ. अजय चौगुले, पृथ्वीराज मोरे, अभय तेंडुलकर, विजय महाडिक, अमर साठे, संग्राम पाटील, उद्योजक राजेश व्हटकर, रवींद्र कानकेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्या महेश चौगुले, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, अजित ठाणेकर, किरण नकाते, नीलेश देसाई, विजय सूर्यवंशी, रवींद्र मुतगी, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरानी गर्दी केली होती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes