Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाऊ पाध्ये हे मानवतावादी, अनुभववादी लेखक - समीक्षक प्रा. अविनाश सप्रे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याघघ ततकोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता - राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा, क्रीडामंत्र्यांचे विधीमंडळात उत्तर !!शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला जोरदार प्रतिसादमहापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसची समिती, चार दिवस मित्रपक्षांशी चर्चासातारा-कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा : खासदार धनंजय महाडिककोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण समारंभअभ्यासाचा भोंगा…!सतेज पाटलांनी गाजविली विधान परिषद, गृहखात्यासह सरकारच्या कामकाजाचे काढले वाभाडे

जाहिरात

 

संगोपन

schedule26 Nov 21 person by visibility 778 category

महोदय,
संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि ऑन्को लाइफ कँसर सेंटर नरेवाडी तालुका गडहिंग्लज, कोल्हापूर
आपणांस कळविण्यास आनंद होत आहे कि, वैद्यकीय सेवेमध्ये रुजू होत असलेल्या कै. गुंडू (हमाल) अण्णाप्पा पाटील शैक्षणिक, सामाजिक मेडिकल बहुउद्देशीय चारिट्रेबल ट्रस्ट, नरेवाडी संचलित संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या मल्टी व कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घघाटन सोहळा शनिवार दिनांक 27/11/2021 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री मा.ना. हसन मुश्रिफसो यांच्या शुभ हस्ते, मा.ना. राजेंद्र पाटील-यड्रावकरसो (आरोग्य राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थितीत मा.आ. राजेश पाटीलसो, मा.आ. प्रकाश आबिटकरसो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. 
हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर सह इतर अनेक आजारांवर सुविधा उपलब्ध केल्या असून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे विभाग हॉस्पिटलमध्ये आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील नरेवाडी येथे असणारे हे हॉस्पिटल तालुक्यासह कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागांतील अनेक गरजूंसाठी उपयुक्त ठरणार आहे. भारतातील सर्वात आधुनिक रेडिएशन उपचार यंत्रणा, सुमारे तीस वर्षाचा रेडिएशन तंत्रातील जागतिक पातळीवर अनुभव असलेले पूर्णवेळ तंत्रज्ञ, निरोगी पेशी सुरक्षित ठेवून अगदी एक एम.एम. इतक्या अचूकतेने कॅन्सर पेशीवर उपचार करणे आणि टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथील दीर्घ अनुभव असलेले कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर हीच या हॉस्पिटलची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.  
यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफ असून टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे कॅन्सर मध्ये प्रशिक्षीत तज्ञ झालेले डॉक्टर उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात अत्याधुनिक आरोग्यदायी व सर्वसामान्यांना परवडतील अशा वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. शासकीय जनआरोग्य योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत उपचार उपलब्ध असणार आहेत. तसेच गरजू रुग्णांसाठी माफक दरात पिक-अप-ड्रॉप सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. जगासमोरील एक कठीण आव्हान म्हणून ज्या कर्करोगाकडे पाहिले जाते, अशा जीवघेन्या आजार असणार्‍यांना हे हॉस्पिटल वरदान ठरणार आहे. 
यावेळी ट्रस्टचे चेयरमन श्री. मच्छिंद्रनाथ पाटील, व्हीसीद्वारे ऑन्को-लाईफचे संस्थापक-अध्य्क्ष श्री उदय देशमुख, डायरेक्टर रिसोर्स डॉ. प्रताप राजेमहाडीक, संगोपनचे एक्झुक्यूटीव्ह डायरेक्टर डॉ.अर्जून शिंदे, अभासेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, प्रसिद्धी प्रमुख़ अमरसिंह राजे, सौ.सुनंदा नाईक ही मंडळी उपस्थित होती.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes