गार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे ५४ व्या उद्यान स्पर्धेचा निकाल जाहीर
schedule21 Nov 24 person by visibility 24 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे भरवण्यात येणाऱ्या विविध गटातील उद्यान स्पर्धा सोळा व सतरा नोव्हेंबर या कालावधीत झाल्या. यंदाच्या ५४ व्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
विविध गटातील स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांची नावे पुढील प्रमाणे : घाटगे पाटील इंडस्ट्रीज, किर्लोस्कर ऑईल इंजीन मौर्य अलाईज, मौर्य ग्लोबल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक, गोकूळ, ताराबाई पार्क ,उषा थोरात, श्रुती कुल्लोली, श्रद्धा शिरगांवकर, सलीम मर्चंट, क्रांती शिरगुप्पे, नम्रता कुलकर्णी.
विजेत्यांना गार्डन्स क्लबच्या वार्षिक पुष्प प्रदर्शनामध्ये पुरस्कार दिले जातील. या सर्व स्पर्धेसाठी खाजगी संस्था, सार्वजनिक संस्था, आणि कारखाने असे गट होते. यामध्ये मोठे, मध्यम, लहान, छोटे, तसेच किचन गार्डन बाल्कनी व टेरेस गार्डन असे उप गट केल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाग प्रेमींनी सहभाग नोंदवला. कोल्हापूरमध्ये इतक्या सुंदर बागा व उद्यान प्रेमींची संख्या वाढत आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व स्पर्धाचे परीक्षण करण्यासाठी आर्किटेक्ट : अदिती जप्तीवाले , ज्योती सातपुते, बोटानिस्ट : डॉ. विनोद शिंपले,डॉ मकरंद ऎतावडे, अग्रिकल्चरल एक्सपर्ट : डॉ सतीश राऊत यांनी परीक्षक म्हणून उत्साहाने कामकाज पाहिले. गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा - पल्लवी कुलकर्णी, उपाध्यक्ष- अविनाश शिरगांवकर, सचिव सुप्रिया भस्मे, कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे, उद्यान स्पर्धेच्या मुख्य समन्वयक - संगीता कोकितकर, प्रशांत पाटील व नेहा काळे यांनी स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
उद्यान स्पर्धेतील विजेत्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे - (१) कारखाने बगीचे - अ. मोठा गट - प्रथम क्रमांक : विभागून -
घाटगे पाटील इंडस्ट्रीज, कागल एमआयडीसी प्लाँट दोन व किर्लोस्कर ऑईल इंजीन, कागल एमआयडीसी. द्वितीय क्रमांक : युनीकेम कागल एमआयडीसी. ब) मध्यम गट - विशेष गौरवास्पद उद्यान :घाटगे पाटील इंडस्ट्रीज, उचगांव. क) लहान गट - प्रथम क्रमांक : मौर्य अलाईज, कागल, द्वितीय क्रमांक : मार्व्हलस इंजिनीयरींग प्रा. लिमिटेड कागल एमआयडीसी. तृतीय क्रमांक : कस्तुरी फाऊंड्री प्रा. लि. युनिट, कागल एमआयडीसी. ड.) छोटा (मिनी गार्डन) गट - प्रथम क्रमांक : मौर्य ग्लोबल, द्वितीय क्रमांक : मौर्य इंडस्ट्रीज, तृतीय क्रमांक: घाटगे पाटील इंडस्ट्रिज, मुडशिंगी युनिट दोन.
खासगी बगीचे अ. मोठा गट - प्रथम क्रमांक : उषा थोरात. द्वितीय क्रमांक :शनील महागांवकर. तृतीय क्रमांक : मेघा किरण पाटील. विशेष गौरवास्पद - संजय घोडावत फार्म हाऊस, मजले. ब. मध्यम गट - प्रथम क्रमांक : श्रुती कुल्लोली , द्वितीय क्रमांक : सुजय तावडे. तृतीय क्रमांक : (विभागून)- विद्युत शहा व रीचा पाटील. क ) लहान गट - प्रथम क्रमांक : श्रद्धा शिरगांवकर. द्वितीय क्रमांक : बेला पिलानी, तृतीय क्रमांक : प्रसाद मंत्री. ड. छोटा गट (मिनी गार्डन) - प्रथम क्रमांक : सलीम मर्चंट, द्वितीय क्रमांक (विभागून) : मनीषा पाटील व राजेंद्र डुणूंग. •तृतीय क्रमांक : तेजराज तेंडोलकर. टेरेस गार्डन - प्रथम क्रमांक : क्रांती शिरगुप्पे, द्वितीय क्रमांक (विभागून) : प्रविण कदम व नम्रता कुलकर्णी. तृतीय क्रमांक : विजयसिंह भोसले. उत्तेजनार्थ क्रमांक : नितीन भावे. किचन गार्डन - प्रथम क्रमांक : उषा थोरात, द्वितीय क्रमांक : वर्षा जाधव. तृतीय क्रमांक: श्रृती कुल्लोली. बाल्कनी गार्डन - प्रथम क्रमांक : नम्रता कुलकर्णी, द्वितीय क्रमांक : स्वरुपा कालेकर, तृतीय क्रमांक : सुनिता करकरे. संस्था व सार्वजनिक बगीचे - मोठा गट - विशेष गौरवास्पद पारितोषीक - संजय घोडावत विदयापीठ अतिग्रे. मध्यम गट - प्रथम क्रमांक : डी. वाय. पाटिल हॉस्पिटल कदमवाडी, द्वितीय क्रमांक : संजय घोडावत स्कूल, अतिग्रे. तृतीय क्रमांक : कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघ, गोकूळ शिरगांव. लहान गट - प्रथम क्रमांक : संजय घोडावत गृप, चिपरी ऑफीस. द्वितीय क्रमांक : संजय घोडावत हॉस्टेल, अतिग्रे. तृतीय क्रमांक (विभागून) : महालक्ष्मी पशुखादय, कागल एमआयडीसी व शिवतेज उद्यान पन्हाळा.
छोटा गट (मिनी गार्डन) - प्रथम क्रमांक : मौर्य सर्कल व डिव्हायडर कागल एमआयडीसी. द्वितीय क्रमांक : संजय घोडावत ग्रुप (कॉर्पोरेट आफिस) मजले. तृतीय क्रमांक : कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ (ताराबाई पार्क ऑफिस). उत्तेजनार्थ - पाम गृव्ह अपार्टमेंट, कोल्हापूर.
गार्डन्स क्लबचा वार्षिक फ्लॉवर शो व इतर सर्व स्पर्धा ६, ७ व ८ डिसेंबर रोजी महावीर उद्यान, कोल्हापूर येथे आयोजीत केल्या असून बाकी स्पर्धाच्या प्रवेशिका अर्ज दि. १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत कॅडसन कलर लॅब येथे उपलब्ध असतील. तरी सर्व पुष्प व उद्यान प्रेमींनी जरूर विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवावा व पारितोषिकाचे मानकरी व्हावे असे गार्डन्स क्लब तर्फे आवाहन करण्यात आले आहे.