फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
schedule21 Nov 24 person by visibility 237 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माध्यमिक शालांत (दहावी) व उच्च माध्यमिक (बारावी) प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी -मार्च २०२५ परीक्षा पूर्व कामकाजाची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूरचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व सचिव सुभाष चौगुले यांनी दिली आहे.
इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक / तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २४ जानेवारी ते दहा फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आहे. बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ माच २०२५ या कालावधीत आहे. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक / तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा तीन फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आहे. लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ अखेर असेल.
प्राप्त आवेदनपत्र संख्या १९ नोव्हेंबर २०२४ अखेर इयत्ता बारावीसाठी १,१६,१८२ तर इयत्ता दहावीसाठी प्राप्त आवदेनपत्र संख्या - १.३०.८४४ इतकी आहे. बारावीसाठी फेब्रु-मार्च २०२५ आवेदनपत्र ऑनलाईन विलंब शुल्काने भरण्याची दिनांक पंधरा नोव्हेंबर २०२४ ते २२ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आहे. इयत्ता दहावीसाठी वीस नोव्हेंबर २०२४ ते ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यत आहे. इयत्ता दहावी व बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना जादा वेळ, लेखनिक, जवळचे परीक्षा केंद्र या सवलती मिळण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
दहावी व बारावी उत्तरपत्रिका तपासणीसाठी परिक्षक/ नियामक नियुक्ती करण्याचे काम सुरु आहे. दहावी-बारावी परीक्षेसाठी परिरक्षक, केंद्रसंचालक नियुक्तीची कामे सुरु आहेत.तसेच परीक्षा केंद्र निश्चितीकरण करणेचे काम सुरु आहे. दहावी बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले असल्याने शाळांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, विद्यार्थ्यांनी उजळणी करावी. तसेच प्रश्न पत्रिकांचा सराव करावा. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. असे आवाहन विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी
केले आहे.