जैन कल्याणक सर्किटसाठी ललित गांधींना लखनौ भेटीचे निमंत्रण
schedule19 Nov 24 person by visibility 267 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उत्तरप्रदेशमध्ये प्रस्तावित केलेल्या जैन कल्याणक सर्किट प्रकल्पांवर चर्चेसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जैन आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष ललित गांधी यांना लखनौ येथे बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.जैन तीर्थंकरांचे १९ कल्याणक उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी आहेत. या ठिकाणांना जोडणारे "जैन तीर्थंकर कल्याणक सर्किट" बनवण्याच्या मागणीचा प्रस्ताव "अखिल भारतीय जैनअल्पसंख्यक महासंघ" तर्फे उत्तरप्रदेश सरकारला सादर केला आहे.
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कोल्हापूर दौर्याप्रसंगी गांधी यांनी व्यासपीठावर योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी खासदार धनंजय महाडीक,खासदार धैर्यशील माने,राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी त्यांना या संदर्भात बैठकीसाठी लखनौला आमंत्रित केले. त्यानुसार डिसेंबर २०२४ मध्ये गांधी हे उत्तरप्रदेशला जाणार असल्याचे म्हटले आहे.