नेते-उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क ! मतदारांत उत्साह, सकाळी ९ पर्यंत ७.३८ मतदान !!
schedule20 Nov 24 person by visibility 100 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पंधरा दिवसाच्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर बुधवारी, २२ नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात मतदारांचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. दरम्यान महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व उमेदवारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदारांना मतदानाचे आवाहन केले.
दरम्यान सकाळी नऊ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात सरासरी ७.३८ टक्के मतदान झाले होते. यामध्ये चंदगडमध्ये ६.७८ टक्के, राधानगरीत ६.६७ टक्के, कागलमध्ये ८,७८ टक्के, कोल्हापूर दक्षिणमध्ये ७.२५ टक्के, करवीरमध्ये ७.७६ टक्के, कोल्हापूर उत्तरमध्ये ८.२५ टक्के, शाहूवाडीत ७.२३ टक्के, हातकणंगलेत ६.२० टक्के, इचलकरंजीत ७.४७ टक्के व शिरोळमध्ये ७.५३ टक्के मतदान झाले.
भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाहू मार्केट यार्ड जवळील मतदान केंद्र येथे मतदान केले. त्यांनी, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक यांच्यासह कुटुंबांतील सदस्यासोबत मतदानाचा हक्का बजाला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर महापालिका येथील मतदान केंद्र येथे मतदान केले. यावेळी क्षीरसागर यांच्यासोबत पत्नी वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर हे कुटुंबांतील सदस्य होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नागरी सुविधा केंद्र,कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. कोल्हापूर उत्तरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांनी शिवाजी पार्क येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भरत लाटकर, सूरमंजिरी लाटकर त्यांच्यासोबत होते.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शिरोली पुलाची येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी मतदान केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.