दाक्षिणत्या सिनेमाला साजेसा अॅक्शनपट मराठीत, रानटी चित्रपट २२ नोव्हेंबरपासून प्रदर्शित
schedule19 Nov 24 person by visibility 41 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अॅक्शनपटाची काही कमी नाही. त्या तुलनेत मराठीत दे मार स्टाइलचे सिनेमे कमी. मात्र हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमाला साजेसा अॅक्शनपट मराठीत निर्माण केला आहे.दमदार व्यक्तिरेखा, अॅक्शन, इमोशन् आणि सूडनाट्य असा धमाकेदार ‘रानटी ’सिनेमा २२ नोव्हेंबरपासून प्रदर्शित होत आहे.
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित या सिनेमाच्या पोस्टर, ट्रेलरने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता शरद केळकर, संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव देवचक्के, सुशांत शेलार, हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव, नयना मुखे अशी स्टारकास्ट आहे. सिनेमाचे लिखाण हृषिकेश कोळी यांनी केले आहे. अजित परब यांचे संगीत आहे. अमर मोहिले यांचे पार्श्वसंगीत आहे. या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण कोकण आणि मुंबईत झाले आहे. सिनेमात चार गाणी आहेत.
सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर हे मंगळवारी, १९ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात होते. याप्रसंगी त्यांनी, ‘रानटी हा सिनेमा वेगळा आहे. मराठीतील हा अॅक्शनपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे.सिनेमा निर्मिती दरम्यान निर्माता, दिग्दर्शकांनी कोणतीही तडजोड केली नाही. हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा महत्वाची आहे.’