विवेकानंद कॉलेजमध्ये चौथे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन
schedule14 Feb 25 person by visibility 145 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालयातील वाड्.मय मंडळातर्फे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी चौथ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन होत आहे. विवेकानंद कॉलेजच्या ग्रंथालय सभागृहामध्ये सकाळी ९.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन आहे.
लेखक प्रा. डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते आणि श्री स्वामी विवेकांनद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होत आहे. संमेलनाच्या प्रथम सत्रात फेसाटी पुस्तकाचे लेखक नवनाथ गोरे यांची प्रकट मुलाखत आहे. दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. भीमराव धुळूबुळू यांच्या अध्यक्षतेखाली युवा कवी संमेलनाचे आयोजन करणेत आले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विद्यार्थी प्रतिनिधी निधी कुलकर्णी आहे. महाविद्यालयीन युवकांच्या साहित्य प्रज्ञेच शोध घेण्याचा आणि नवोदितांच्या सर्जनशीलतेला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न् आम्ही या साहित्य् संमेलनाच्या माध्यमातून करीत आहोत. साहित्य्, समाज, कला आणि संस्कृती यांची सांगड घालून विविध कौशल्यांचा विकास घडवून आणणे हे संमेलनाचे उद्दिष्ट असल्याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि संमेलनाचे समन्वयक डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले आहे.