Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भुयेवाडीत सर्व रोग निदान शिबिर, आयुष्यमान कार्ड वाटपपालकमंत्र्यांचा उद्योजकांशी संवाद, उद्योगांसाठी जागा- कुशल मनुष्यबळसाठी लवकरच बैठकसत्तर लाखाची अॅडव्हान्स रक्कम संचालकांच्याकडे की कर्मचाऱ्यांकडे ? प्रसाद पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवालकॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी जागृती चव्हाणची कॅम्पसाठी निवडप्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बबन केकरेकोल्हापुरात लवकरच आयटी क्षेत्रातील उद्योजकांची परिषद- उद्योगमंत्री उदय सामंतमॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे दागिने लुटले, पाचगाव-गिरगाव रोडवरील प्रकारपृथ्वी मोरे-ऋतुजा मोहिते विवाह सोहळा दिमाखात, मान्यवरांची उपस्थितीशहीद महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात, विद्यार्थिनी शिक्षकांच्या भूमिकेत !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षक बँकेच्या ठेवी घटल्या ! कर्जे कमी झाल्या, बोगस नफा दाखवला !! -विरोधी आघाडीचा आरोप

जाहिरात

 

माजी सैनिक पत्नीसह गिरविणार दूरशिक्षणाचे धडे 

schedule03 Sep 25 person by visibility 194 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना व अपूर्ण शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना शिक्षण घेण्याची संधी देत आले आहे. प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलगा – वडील, मुलगा – आई, भाऊ – बहिण, भाऊ – भाऊ, बहिणी- बहिणी, मुलगी – वडील आदींनी एकाच वेळी शिक्षण घेतले आहे. आता या यादीत पती-पत्नी यांचाही समावेश झाला आहे.

मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी येथील माजी सैनिक बसगोंडा तायगोंडा पाटील (वय ६०) यांनी आपल्या पत्नी स्मिता यांच्यासह राहिलेले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले आणि शिक्षण पूर्णत्वाकडे नेण्यासाठी दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र अंतर्गत श्री. शहाजी छत्रपती महाविद्यालय येथे बी.ए.भाग १ मध्ये प्रवेश घेतला आहे.विशेष म्हणजे दोघांनी ही वेगवेगळे ऐच्छीक विषय ठेवलेले आहेत. तवेगवेगळ्या विषयाचे ज्ञान आपणास मिळाले पाहिजे. त्याचा उपयोग कुटुंबातील सर्वाना झाला पाहिजे. ज्ञान हे जीवनाला आकार देते.त्यातून सांस्कृतिक ,वैचारिक जडणघडण होते.माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो. असे मत पाटील दांपत्यानी व्यक्त केले. 
  बसगोंडा पाटील यांनी गावातच प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिकचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण करून शिवराज महाविद्यालयात ज्युनिअरचे शिक्षण पूर्ण केले.पुढे २० वर्षे  आर्मी डेंटल कोरमध्ये डेंटल हायजिनिस्ट म्हणून कामकाज पाहिले आहे.त्याच बरोबर त्यांच्या पत्नी स्मिता पाटील यांनी पुणे येथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. पाटील दांपत्याने बी.ए.भाग १ साठी प्रवेश घेतल्याबद्दल संचालक डॉ.के.बी.पाटील,उपकुलसचिव व्ही.बी.शिंदे, समन्वयक डॉ.चांगदेव बंडगर,सहायक प्राध्यापक डॉ.सचिन भोसले, डॉ. नितीन रणदिवे यांनी त अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes