Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची  बैठकवडणगेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला खासदार, शाळा प्रवेशोत्सव जल्लोषातडॉ. व्ही. एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कारफुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकरनी दिले खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण पंचगंगा हॉस्पिटलला डीपीडीसीतून‌ 25 लाखाचा निधी उपलब्ध करू - ऋतुराज क्षीरसागर खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण- चेअरमन मच्छिंद्र नाळेपीएमश्री विद्यामंदिर कणेरीवाडीत  शाळेतील पहिले पाऊल उपक्रम लोहिया हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागतसरगम म्युझिकल ग्रुपतर्फे शंभर गाणे सादरीकरणाचा रेकॉर्डशिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करा, शिक्षकेतर सेवक संघाचे आंदोलन

जाहिरात

 

फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकरनी दिले खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण

schedule18 Jun 25 person by visibility 111 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : एटी फाउंडेशन, कोल्हापूर या स्वंस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यामधील तीन तालुक्यातील निवडक खेडेगावातील ३० मुलामुलींसाठी तीन दिवसीय निवासी फुटबॉल शिबिर घेण्यात आले. आठ महिन्यापूर्वी एटी फाउंडेशन ने निवडक १० गावांमध्ये व्हिलेज फुटबॉल डेव्हलपमेंट प्रकल्प सुरू केला. फुटबॉल खेळाचे साहित्य देवून प्रशिक्षणाचे काम हाती घेतले होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एटी फाउंडेशनमार्फत गावोगावी प्रशिक्षण देण्यास सुरवात केली.  यामधून ३० मुलामुलींची निवड करून एटीएफ गिजवणे हायस्कूल सेंटर येथे कॅम्प भरवण्यात आला. तसेच शिबिरादरम्यान एटीएफ लीडर्सना देखील फुटबॉल प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 

शिबिरामध्ये फुटबॉल प्रशिक्षणासोबत मुलांना त्यांच्या सवयी, वागणे, आदर करणे, अभ्यास करणे, योग्य ते जेवणे, प्रामाणिक राहणे, समयसूचकता बाळगणे ह्या विषयांवर ज्ञान देण्यात आले. क्रीडाशिक्षक अनिल पाटील यांनी सहकार्य केले एटीएफ व्हिलेज लीडर्स अक्षय पावले, शैलेश दळवी, सानिका रेडेकर, वैभवी पाटील, श्रृती दिवटणकर, कस्तुरी कदम, कौशिक इकके यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

अंजू तुरंबेकर म्हणाल्या, खेडेगावातील मुलांमध्ये खेळाची आवड अफाट आहे.  जिद्द आणि आत्मविश्वास दिसून येतो. त्यांना योग्य ती दिशा दाखवणे व मार्गदर्शन देणे गरजेचे आहे. आजच्या युगात मोठ्या प्रमाणात पालक मुलांना खेळापासून दूर घेवून जात आहेत जे खूप घातक ठरत आहे. आमच्या कार्याद्वारे आम्ही मुलांना खेळ व अभ्यासात समतोल राखणे तसेच जीवनशैलीचा विकास करणे शिकवत आहोत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes