Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पत्नीच्या स्मरणार्थ प्राध्यापकांकडून विद्यापीठातील होस्टेलसाठी पाच लाखाची देणगीराज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची  बैठकवडणगेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला खासदार, शाळा प्रवेशोत्सव जल्लोषातडॉ. व्ही. एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कारफुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकरनी दिले खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण पंचगंगा हॉस्पिटलला डीपीडीसीतून‌ 25 लाखाचा निधी उपलब्ध करू - ऋतुराज क्षीरसागर खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण- चेअरमन मच्छिंद्र नाळेपीएमश्री विद्यामंदिर कणेरीवाडीत  शाळेतील पहिले पाऊल उपक्रम लोहिया हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागतसरगम म्युझिकल ग्रुपतर्फे शंभर गाणे सादरीकरणाचा रेकॉर्ड

जाहिरात

 

डॉ. व्ही. एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार

schedule18 Jun 25 person by visibility 314 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा  विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना येथील रोटरी क्लब ऑफ करवीरच्यावतीने ‘करवीर भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्लबचे प्रेसिडेंट कुशल पटेल आणि सचिव नारायण भोई यांनी ही घोषणा केली आहे. शिंदे यांचे शैक्षणिक, प्रशासकीय कार्य, विज्ञान लेखनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम आणि जलसंवर्धनविषयक जनजागृतीसाठी त्यांनी चालविलेले कृतीशील उपक्रम या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. येत्या शुक्रवारी (दि. २०) महासंचालक प्रतिनिधी राजू दोशी यांच्या हस्ते आणि सहाय्यक गव्हर्नर गिरीष जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत चार्टर नाईट समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ताराबाई पार्क येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये हा समारंभ होईल. डॉ. शिंदे हे गेली अनेक वर्षे विज्ञान लेखनाच्या माध्यमातून वैज्ञानिक प्रसार व जागृतीचे कार्य करीत आहेत. एककांचे मानकरी, हिरव्या बोटांचे किमयागार, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया, एककांचे इतर मानकरी, कृषीक्रांतीचे शिलेदार आणि भावणारी झाडे ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. विविध संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes