वडणगेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला खासदार, शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात
schedule18 Jun 25 person by visibility 37 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील वडणगे येथील शिवाजी विद्या मंदिर आणि कन्या विद्या मंदिर येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात झाला. खासदार धनंजय महाडिक यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी सेल्फी घेतला. दरम्यान ढोल ताशांच्या गजरात आणि हलगीच्या कडकडाटात लेझीम नृत्य सादर करत पारंपरिक वेशभूषत आलेल्या मुलांचे शाळा परिसरात जल्लोषी स्वागत झाले. खासदार महाडिक यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी वडणगेच्या सरपंच संगीता पाटील, उपसरपंच उमाजी शेलार, बाजीराव पाटील, तानाजी पाटील, एम. बी. किडगावकर, इंद्रजित पाटील, सर्जेराव पाटील, कृष्णात जौंदाळ, बाबासाहेब पाटील, चिखलीचे सरपंच रोहित पाटील उपस्थित होते.