सरगम म्युझिकल ग्रुपतर्फे शंभर गाणे सादरीकरणाचा रेकॉर्ड
schedule18 Jun 25 person by visibility 30 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सरगम म्युझिकल ग्रुप एसएच्यावतीने लावणीसम्राज्ञी स्व. सुलोचना चव्हाण यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त १०० लावणी गीतांचे सादरीकरण करून विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. या उपक्रमाची ‘ग्लोबल जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली. सागरमाळ येथील सभागहात रविवारी (१५ जून २०२५) रोजी हा कार्यक्रम झाला. अंबेजोगाईचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले, डॉ. आशा जाधव, माजी महापौर शिवाजीराव कवाळे, भूलतज्ज्ञ डॉ. शिवाजी जाधव, अरविंद कस्तुरे,सुहास ककरेकर, प्रमुख पाहुणे होते. ग्लोबल जिनियस बुक ऑफ रेकॉर्डचे निरीक्षक कार्यक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी उपस्थित होते. उदय पाटील, डॉ. अनिल कवठेकर, डॉ. अनिता परीतेकर, चित्रा कवाळे, डॉ. सरस्वती कणसे, माया मनपाडळेकर, शशिकांत पाटील, के. टी. शिंदे, राजकुमार पारकर, डॉ. स्मिता मोरे, सुमन बेंद्रे, अनिता गवळी,अंजली धारीया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. याप्रसंगी स्व. सुलोचना चव्हाण यांच्या गाजलेल्या लावण्या तसेच मराठी लोकगीते बालकलाकारांपासून ते ८० वर्षापर्यंतच्या अनेक हौशी कलाकारांनी सादर केली. कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकारांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व विशेष मेडल प्रदान केले.