लोहिया हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत
schedule18 Jun 25 person by visibility 15 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. स. म. लोहिया हायस्कूलमध्ये २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. संपूर्ण शालेय परिसरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रवेशद्वाराच्या सुरूवातीस दुतर्फा फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुलांच्या माळा, विविध रंगातील फुगे यांचा वापर करून संपूर्ण शालेय प्रवेशद्वार आकर्षक पद्धतीने सजावट केली होती. संस्थेचे सहसचिव व माजी प्राचार्य एस. एस. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी प्राचार्या सविता पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत करत होत्या. प्राचार्या पाटील यांनी, प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे सहसचिव चव्हाण यांच्या हस्ते प्रभारी प्राचार्या पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांला पाठ्यपुस्तके तसेच शालेय उपयोगी भेटवस्तू देवून स्वागत केले.