Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची  बैठकवडणगेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला खासदार, शाळा प्रवेशोत्सव जल्लोषातडॉ. व्ही. एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कारफुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकरनी दिले खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण पंचगंगा हॉस्पिटलला डीपीडीसीतून‌ 25 लाखाचा निधी उपलब्ध करू - ऋतुराज क्षीरसागर खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण- चेअरमन मच्छिंद्र नाळेपीएमश्री विद्यामंदिर कणेरीवाडीत  शाळेतील पहिले पाऊल उपक्रम लोहिया हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागतसरगम म्युझिकल ग्रुपतर्फे शंभर गाणे सादरीकरणाचा रेकॉर्डशिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करा, शिक्षकेतर सेवक संघाचे आंदोलन

जाहिरात

 

पंचगंगा हॉस्पिटलला डीपीडीसीतून‌ 25 लाखाचा निधी उपलब्ध करू - ऋतुराज क्षीरसागर

schedule18 Jun 25 person by visibility 91 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटलला राज्य सरकारच्या वतीने कायाकल्प योजना अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. याबद्दल शिवसेनेच्यावतीने  युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते हॉस्पिटलमधील प्रशासन आणि कर्मचारी यांचा मानाचा फेटा, शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. 
 पंचगंगा हॉस्पिटल येथे पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान हॉस्पिटलच्या अंतर्गत सुधारणांसाठी  आमदार राजेश क्षीरसागर  यांच्यावतीने  डीपीडीसीच्या माध्यमातून आणखी 25 लाखाचा निधी मंजूर करून घेऊ, अशी घोषणा यावेळी ऋतुराज क्षीरसागर यांनी केली.

  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे,आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटल मधील  गरोदर मातांना डिंक लाडू चे वाटप करण्यात आले. सूत्रसंचलन सौरभ कुलकर्णी यांनी तर आभार रियाज बागवान यांनी मानले..

यावेळी सनी अतिग्रे, उमेश जाधव, सूरज धनवडे, अनंत पाटील, किरण मांगूरे, अक्षय ओतारी, अक्षय धनवडे, शिरीष गवळी, जयराज ओतारी, यशश्री घाटगे,  दिपाली अतिग्रे, प्रणोती पाटील सई पाटील, रोहन शिंदे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes