Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पत्नीच्या स्मरणार्थ प्राध्यापकांकडून विद्यापीठातील होस्टेलसाठी पाच लाखाची देणगीराज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची  बैठकवडणगेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला खासदार, शाळा प्रवेशोत्सव जल्लोषातडॉ. व्ही. एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कारफुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकरनी दिले खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण पंचगंगा हॉस्पिटलला डीपीडीसीतून‌ 25 लाखाचा निधी उपलब्ध करू - ऋतुराज क्षीरसागर खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण- चेअरमन मच्छिंद्र नाळेपीएमश्री विद्यामंदिर कणेरीवाडीत  शाळेतील पहिले पाऊल उपक्रम लोहिया हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागतसरगम म्युझिकल ग्रुपतर्फे शंभर गाणे सादरीकरणाचा रेकॉर्ड

जाहिरात

 

राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची  बैठक

schedule18 Jun 25 person by visibility 102 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच सर्व पारंपरिक विद्यापीठांची संयुक्त बैठक आयोजित करू तसेच राज्याच्या कृषिमंत्र्यांसह राज्यातील कृषी विद्यापीठांना भेट देऊन तेथील संशोधनाची विस्तृत माहिती घेऊ, असे राज्यपालांनी बैठकीत सांगितले. बैठकीत विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर पदांवरील भरती, विद्यापीठांमधील वैधानिक पदांची भरती, उच्च व तंत्रशिक्षण विभागाची पहिल्या १०० दिवसांमधील उपलब्धी, शिकाऊ उमेदवारी संलग्न पदवी अभ्यासक्रम, कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठांमधील प्रशासन सुधार, सर्व पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता आदी विषयांवर चर्चा झाली. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes