शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करा, शिक्षकेतर सेवक संघाचे आंदोलन
schedule18 Jun 25 person by visibility 13 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करावी यासाठी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक - उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक शिक्षकेतर संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. मंगळवारी (१८ जून २०२५) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात भरती थांबविलेल्या संदर्भातील परिपत्रकाची होळी केली.
संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्याध्यक्ष अशोक पाटील, संजय पाटील, उमेश माळी, मारुती मुगुटकर, राजशेखर सुर्वे, सचिन पाटील, मनोहर जाधव आदींचा आंदोलनात सहभाग होता. आंदोलनाला शिक्षक नेते दादासाहेब लाड, शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, भरत रसाळे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सुरेश संकपाळ, श्रीधर गोंधळी, रामदास पाटील, राजेंद्र साळोखे, यांनी पाठिंबा दिला. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती थांबविली आहे. हे परिपत्रक रद्द करावे. सरकारने त्वरित भरती प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले.
……………….