डॉ. स्वाती शिंदे- पवार यांचा 'ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या मानद डिलीटने सन्मान
schedule10 Jan 21 person by visibility 427 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
सांगली जिल्ह्यातील विटा येथील लेखिका व वक्त्या डॉ .स्वाती शिंदे -पवार यांना ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने मानद डिलीट देऊन सन्मानित केले आहे. त्या गेल्या दोन दशकाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांना यापूर्वी विविध संस्थांनी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या ‘साहित्य आणि व्यक्ती’ या त्यांच्या कार्याबद्दल संशोधन करून पीएचडी मिळवली आहे. डॉ. शिंदे या खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथील प्राथमिक शाळेतील केंद्र मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या नावावर सात कवितासंग्रह, पाच निबंध व भाषणसंग्रह, समीक्षाग्रंथ आहेत. विविध विद्यापीठातून त्यांच्या कविता व पुस्तके अभ्यासक्रमात लागलेली आहेत. याशिवाय पती अनिल पवार यांच्या प्रेरणेने डॉ. स्वाती यांनी गेल्या पंचवीस वर्षात सुमारे सव्वाशेहून अधिक गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्याना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या योगदानाची नोंद घेऊन ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने मानद डिलीट ही पदवी बहाल केली आहे.