जुन्या पेन्शनसाठी पडताळणीसह प्रस्ताव मागवून घ्या - भरत रसाळे
schedule22 May 25 person by visibility 117 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : एक नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनबाबतचे प्रस्ताव मुख्याध्यापकांचे पडताळणीसहकडून मागवून शिक्षणाधिकारी यांना कळवावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्यध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे केली .
निवेदनात हायकोर्टाने राज्यातील खाजगी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जुन्या पेन्शनबाबतचे प्रस्ताव 45 दिवसाच्या आत पडताळणी करण्याबाबतचा निर्णय दिला आहे .राज्यातील अन्य विभागातील उपसंचालकांनी अशा प्रस्तावबाबत आपआपल्या विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना कळलेले आहे . पण कोल्हापूर विभागातून अशा प्रकारची कार्यवाही केलेली नाही .त्यामुळे कोल्हापूर विभागातील सांगली ,सातारा कोल्हापूर 'सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील 1नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रस्तावाची मागणी करणे प्रलंबित राहिलेली आहे .त्यामुळे अन्य विभागाप्रमाणे आपले कोल्हापूर विभागाकडूनही असे प्रस्ताव मागवून घेणेबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात यावे "असे म्हटले आहे . शिष्टमंडळामध्ये समितीचे राज्य सचिव शिवाजी भोसले , जिल्हाध्यक्ष कुमार पाटील ,पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे व जुन्या पेन्शन हक्क संघटनेचे सदस्य सुदेश जाधव होते.