अनिल मेहता, अरुणा ढेरे यांना पुरस्कार ! प्रसाद प्रकाशनतर्फे पुण्यात वितरण समारंभ !!
schedule22 May 25 person by visibility 85 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे येथील प्रसाद प्रकाशनतर्फे प्रकाशन अनिल मेहता व कवयित्री अरुणा ढेरे यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. शनिवारी (३१ मे २०२५) एस एम जोशी सभागृह गाजवे चौक पुणे येथे सायंकाळी ५.३० वाजता पुरस्कार वितरण समारंभ आहे. प्रसाद प्रकाशनतर्फे दरवर्षी प्रकाशन क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. शाल, श्रीफळ व रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रसाद प्रकाशनतर्फे यंदा पुरस्कार वितरण व ग्रंथ प्रकाशन असा संयुक्त समारंभ होत आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील गीता धर्म मंडळचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार आहेत. इतिहासतज्ज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर, राष्ट्रीय पुरस्कार न्यासचे विश्वस्त राजेश पांडे हे प्रमुख पाहुणे आहेत. याप्रसंगी प्रा. घाणेकर यांचे ‘हरवलेले पुणे’ या विषयावर व्याख्यान आहे. या कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रसाद प्रकाशन व प्रसाद ज्ञानपीठचे संचालक डॉ. उमा बोडस यांनी केले आहे.