जिल्हा काँग्रेस कमिटीत राजीव गांधींना अभिवादन
schedule21 May 25 person by visibility 56 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या फोटोचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते फोटो पूजन झाले. सुभेदार मेजर एन एन पाटील यांच्या हस्ते गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. याप्रसंगी संजय पोवार वाईकर, राहुल माने अभिजीत देठे, दिग्विजय मगदूम, रंगराव देवणे, डॉ. प्रमोद बुलबुले, वैशाली महाडिक, मंगल खुडे, उज्वला चौगले, अरुण कदम, विनायक घोरपडे, अशोक माळी, दत्ताजीराव वारके, सिंधू शिराळे, वैशाली पाडेकर, मीरा कांबळे, उज्वला चौगुले, वैशाली जाधव, महेश कांदेकर, प्रकाश मोरे,संजय पटकारे, कृष्णराज पटकारे, कृष्णा शिंदे, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, ॲड. रोहन शालबिद्रे यशवंत थोरवत,अक्षय शेळके, युवराज पाटील, बाबुराव कांबळे आदी उपस्थित होते.