Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ढ तत ततकोल्हापुरात सर्किट बेंचची स्थापना निश्चित होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजिपतील बदल्या…प्रशासनाकडून चित्रीकरणाद्वारे सुलभ प्रक्रिया !  बदल्यामध्ये अनियमितता झाल्याची लिपीक संघटनेची तक्रार !अनिल मेहता, अरुणा ढेरे यांना पुरस्कार ! प्रसाद प्रकाशनतर्फे पुण्यात वितरण समारंभ !!अलमट्टी धरणाच्या  उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, धनंजय महाडिकांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांची भेटकोल्हापूरच्या एसपींची बदली ! योगेश कुमार गुप्ता नवे पोलिस अधीक्षक !!जुन्या पेन्शनसाठी पडताळणीसह प्रस्ताव मागवून घ्या - भरत रसाळेप्लास्टिकचा राक्षस विद्यार्थ्यांनी केला  बाटलीत  बंद ! अलमट्टीसंदर्भात पंधरा दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठक-जलसंपदामंत्री  राधाकृष्ण विखे पाटीलराष्ट्रीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेला प्रारंभ

जाहिरात

 

प्लास्टिकचा राक्षस विद्यार्थ्यांनी केला  बाटलीत  बंद !

schedule22 May 25 person by visibility 241 categoryआरोग्य

विवेकानंद कॉलेजचा पर्यावरणपूरक उपक्रम, २०० किलो प्लास्टिकचे संकलन

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एकल वापर प्लास्टिक हे पर्यावरणास खूप घातक ठरत आहे. कारण ते पुनर्वापर(Reuse)करता येत नाही, तसेच पुनर्चक्रीकरण करणे दुरापास्त असते. मग ते गटारे - प्रवाह तुंबणे, प्राण्यांच्या पोटात जाऊन अडकून बसणे, समुद्रतळाशी जाऊन तेथील जैवविविधता धोक्यात आणणे हे दुष्परिणाम घडवून आणतात.  म्हणून त्यानिमित्ताने विवेकानंद ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण विभागामार्फत एक उपक्रम दिला होता. त्याचे नाव होतेप्लास्टिकचा राक्षस....करा बाटलीत बंद ! एकल वापर प्लास्टिकचे संकलन हा उपक्रमाचा उद्देश.

इयत्ता ११वी आर्ट्स आणि कॉमर्स मधील जवळपास ६०० विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेऊन जवळपास २०० किलो प्लास्टिकचा राक्षस बाटलीत बंद केला आहे. यामध्ये चॉकलेट, प्लास्टिक पिशवी, स्ट्रॉ असे बरेच वस्तू प्रकार आहेत. या उपक्रमाविषयी सांगताना प्राचार्य आर. आर. कुंभार म्हणाले, विवेकानंद महाविद्यालय हे विद्यार्थ्याच्या सर्वांग विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. प्लास्टिक समस्या आज पर्यावरणासाठी मोठे आव्हान ठरत असताना महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम सर्वांसाठी मार्गदर्शक  आहे.’

ज्युनिअर कॉलेजच्या आर्टस, कॉमर्स विभागप्रमुख प्रा. शिल्पा भोसले यांनी, ‘प्लास्टिक हे पर्यावरणासाठी एक गंभीर धोका आहे. ते विघटन न होणारे असून हजारो वर्षे जमिनीत राहते. प्लास्टिकमुळे माती, पाणी आणि समुद्री जीवसृष्टीचे मोठे नुकसान होते.त्यामुळे प्लास्टिक वापर कमी करणे आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडणे ही काळाची गरज आहे.  निसर्ग संपदेचे संवर्धन , नैसर्गिक स्तोत्रांचे जतन .. हे संस्कार विद्यार्थ्यांच्यात रुजवण्याचे काम महाविद्यालय वेगवेगळ्या उपक्रमातून करत असते.’

पर्यावरण आणि जलसुरक्षा विभागचे  प्रा.अनिल धस, यांनी, ‘पर्यावरण हा अतिशय संवेदनशील विषय असून आज भावीपुढे प्लास्टिक व इतर पर्यावरणीय समस्यांमुळे अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना, लढा प्लॅस्टिक प्रदूषणाशी असा आहे.  पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयाच्या माध्यमातून तरुणांना सहभागी करून घेऊन या समस्या सोडविणे शक्य आहे.” 

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes