कोल्हापूरच्या एसपींची बदली ! योगेश कुमार गुप्ता नवे पोलिस अधीक्षक !!
schedule22 May 25 person by visibility 556 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने गुरुवारी, (२२ मे २०२५ ) पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये २१ बडया अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अनेक जिल्हयांना नवीन पोलिस अधीक्षक मिळाले आहेत. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलिस उपआयुक्तपदी बदली झाली. तर नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक असतील.
सांगलीचे अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांची पोलिस अधीक्षक धाराशिव येथे बदली झाली. सातारा येथील पोलिस अधीक्षक समीर अस्लम शेख यांची बृहन्मुबंई पोलिस उपआयुक्तपदी बदली झाली. लोहमार्ग पुणे येथील पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची सातारा पोलिस अधीक्षकपदी बदली झाली. अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबई पोलिस उपआयुक्तपदी बदली झाली.रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानंगर पोलिस अधीक्षक म्हणून झाली.पुणे येथील आंचल दलाल यांची रायगड पोलिस अधीक्षकपदी तर अकोला येथील पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची समादेशक रा. रा. पोलिस बल गट क्रमांक ४ नागपूर येथे बदली झाली.नागपूर शहर पोलिस उप आयुक्त अर्चित चांडक यांची बदली नागपूर लोहमार्ग पोलिस अधीक्षकपदी झाली आहे. जयंत मीना यांची लातूरच्या पोलिस अधीक्षकपदी तर नितीन बगाते यांची रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण येथे बदली झाली. गडचिरोली येथील अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांची बदली पोलिस अधीक्षक पालघर येथे झाली.सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक सौरभ अगरवाल यांची बदली पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे झाली आहे. ठाणे शहर पोलिस उप आयुक्त मोहन दहीकर यांची बदली सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकपदी बदली झाली. बुलढाणा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली नागपूर येथील समादेशक रा. रा. पोलिस बल गट क्रमांक ९ येथे झाली. नागपूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे याची बदली बुलढाणा पोलिस अधीक्षकपदी बदली झाली.