अॅथलेटिक्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी शहाजी सुर्यवंशी, उपाध्यक्षपदी हेमचंद्र सरनाईक
schedule21 May 25 person by visibility 43 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी शहाजी सुर्यवंशी, उपाध्यक्षपदी हेमचंद्र सरनाईक यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या सचिवपदी प्रकुल पाटील-मांगोरे यांची निवड झाली. या कार्यकारिणीचा कालावधी २०२८ पर्यंत आहे. सहायक धर्मादाय आयुक्त एक यांच्या निवडीनुसार विशेष सभेत निवडी झाल्या. कार्यकारिणीत खजानिसपदी आर. डी. पाटील, सदस्यपदी आर. बी. पाटील, आर. व्ही. शेटगे, प्रा. डॉ. एस जे फराकटे, कृष्णात लाड, सयाजी पाटील, सतीश पाटील, सचिन पाटील यांचा समावेश आहे.