Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण थथकार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, महापालिका निवडणूक ताकतीने लढविणार- व्ही. बी. पाटीलमुंबईने एक लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारावे, सरकार सहकार्य करेल –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराधानगरीतील गुडाळमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेशगृहमंत्रीपदासाठी मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते! संजय राऊत यांचे पुस्तकातून प्रकटीकरण !!खासदार महाडिकांचे गोकुळसंदर्भात ज्ञान कमी, डोंगळेंच्यावर अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही – आमदार सतेज पाटीलगांधीनगर प्रादेशिक पाणी पुरवठा कामावरुन अधिकारी धारेवर, तर एमजीपीसह मेघा इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयाला टाळे -आमदार सतेज पाटीलगार्डन्स क्लबतर्फे कोल्हापुरात दोन दिवसीय ग्रीन शॉपीचे आयोजनवीज कंत्राटी कामगार कायम कधी होणार ? दहा जूनच्या निर्णयाकडे लक्ष !कोल्हापुरात निघणार शनिवारी तिरंगा पदयात्रा, दसरा चौकातून प्रारंभ

जाहिरात

 

गोकुळमध्ये अरुण डोंगळेंची भूमिका योग्यच, मंत्री मुश्रीफांनी महायुतीचा धर्म पाळावा - नाथाजी पाटील

schedule15 May 25 person by visibility 701 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " गोकुळ दूध संघात चेअरमन अरुण डोंगळे यांची भूमिका योग्यच आहे. आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीचा धर्म पाळावा." असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी म्हटले आहे  गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष बदलाच्या अनुषंगाने हालचाली सुरू आहेत.  गोकुळचे अध्यक्ष  डोंगळे यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतलेली आहे‌

या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,  कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे नेते म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नेतृत्व करतात . सहकारी संस्थांच्या कामकाजात सुद्धा मुश्रीफ यांची भूमिका ही महायुतीला पूरकच असली पाहिजे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी महायुतीशी प्रतारणा न करता कुमार डोंगळे यांच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा. गोकुळ दूध संघात महायुतीचा चेअरमन राहील आणि त्याचे नेतृत्व हसन मुश्रीफच करतील यासाठी प्रयत्न करावेत.
     सहकारी संस्थांच्या बाबतीत सुद्धा  मुश्रीफ यांनी सोयीची भूमिका न घेता  महायुतीशी सुसंगत भूमिका घेऊनच जिल्ह्याचे राजकारण करावे . महायुतीचे खायचे आणि महाविकास आघाडीचे गायचे अशी भूमिका  मुश्रीफ यांनी सोडून द्यावी .असे आवाहन  भाजपा जिल्हाध्यक्ष  पाटील यांनी केले आहे .
     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांच्या मध्ये महायुती कशी सत्तेतील हेच पाहणे गरजेचे आहे .
 मुश्रीफ यांचा राजकीय इतिहास पाहता ते प्रत्येक वेळी आपली सोयीची भूमिका घेतात पण महायुती सत्तेत असताना सध्याच्या घडीला त्यांनी महायुतीशीच प्रामाणिक राहून काम करायला हवे .
     सहकारी संस्थांच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सोबत पूरक भूमिका घेऊन  मुश्रीफ  हे महायुतीच्या विचाराशी प्रतारणाच करत आहेत . याचे उत्तम उदाहरण म्हणजे केडीसीसी बँकेच्या निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक सहकारी संस्थांच्या मतदार संघवाईज सभासदांच्या च्या याद्या त्यांचे शिलेदार व कॉग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचे शिलेदार एकत्रीत पणे भाजपा व शिवसेना शिंदे गट यांना वगळून वाटप करत आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना बळ देण्याची भूमिका घेत आहेत . जिल्हयातील अन्य सहकारी संस्थांच्या निवडीत मुश्रीफ महाविकास आघाडीच्या नेत्यांना पदे देत आहेत. मुश्रीफांची  चुकीची भूमिका असून, आपण ज्या महायुतीच्या जीवावर मंत्री झालो त्या महायुतीच्या ताब्यात जिल्ह्याचे राजकारण राहिले पाहिजे अशी भूमिका घ्यायला हवी .नाही तर अशा सहकारी संस्थांच्या कारभारात महाविकास आघाडीं च्यानेत्यांना बळ देऊन त्यांच्याशी पूरक भूमिका घेणाऱ्या मुश्रीफ यांच्या बद्दल आम्हाला म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे दाद मागावी लागेल .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes