+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशरद पवार गटातर्फे इस्लामपुरातून जयंत पाटील, कागलमध्ये समरजित, तासगावात रोहित पाटील ! चंदगड, इचलकरंजी वेटिंगवर !! adjustचार विद्यमान-तीन माजी आमदारासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनाने भरली रंगत adjust वेस्ट झोन शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत पृथ्वीराज महाडिकांचा सुवर्णवेध adjustआमची बांधिलकी शेतकऱ्यांशी, चिंताही शेतकऱ्यांचीच ! सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे-हसन मुश्रीफांचा पलटवार adjustहातकणंगलेतील शिक्षकांच्या कामाचा वेळेत निपटारा-गटशिक्षणाधिकाऱ्यांची पुरोगामीला ग्वाही adjustअभिषेक मिठारींकडून शरण साहित्य अध्यासनास अकरा हजार रुपयांची देणगी adjustकागलमधून समरजितसिंह घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल adjustमहाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे किंवा राजेश लाटकर adjustआमदार ऋतुराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल adjustशक्तीप्रदर्शन करत अमल महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल
1001157259
1001130166
1000995296
schedule07 Jul 24 person by visibility 429 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महायुती सरकारने राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडक बहिण योजना सुरू केली आहे. संपूर्ण राज्यभर या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेवरुन सरकारवर टीका करणारे काँग्रेसवालेही आता महिलांकडूक लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरुन घेत आहेत. मात्र काँग्रेसच्या भूमिकेविषयी सांशकता आहे. या योजनेचा लाभ महायुतीला मिळू नये म्हणून महिलाकडून आता स्विकारलेले  फॉर्म जमा करणार नाहीत आणि नंतरने सरकारने लाभ दिला नाही असा डांगोरा पिटतील. तेव्हा महिलांनी सरकारी अधिकृत केंद्रावर, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडेच फॉर्म जमा करावेत. ’असे आवाहन खासदार महाडिक यांनी केली.
लाडकी बहिण योजना व अर्थसंकल्पातील अन्य तरतुदी यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी भाजतर्फे फॉर्म भरण्याचे कॅम्प सुरू आहेत तसेच सुविधा केंद्र व अन्य सरकारी यंत्रणेद्वारेही या योजनेचे फॉर्म भरुन घेतले जातात. महिला वर्गांनी त्याचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
शहर परिसरात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कॅम्वरुन महाडिक यांनी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वावर नाव न घेता निशाणा साधला. महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूर दक्षिण, कसबा बावडा येथे काँग्रेसकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे फॉर्म महिलांकडून भरुन घेतले जात आहेत. लाडकी बहिण योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजून झुकेल, काँग्रेसचे हक्काचे मतदानही महायुतीला होईल या भितीने कॉँग्रेसकडून कम्प सुरू आहेत. आता ते फॉर्म भरुन घेतील आणि नंतर जमा करणार नाहीत. आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लाभ दिलाच नाही असा कांगावा करतील’
पत्रकार परिषदेला माजी आमदार अमल महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, सत्यजित कदम, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाराणी निकम आदी उपस्थित होते.
……………….
विरोधकांनी योजनेच्या पैशाविषयी चिंता करू नये…
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाही लाँगलाइफ चालणारी आहे. येत्या भाऊबीजेला महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होतील. महायुती सरकारच्या या योजनेचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. मात्र काँग्रेस व विरोधक मंडळी टीका करत आहेत. त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा नाही. शिवाय विरोधकांनी या योजनेविषयी, आर्थिक तरतुदीविषयी बिलकूल चिंता करू नये.’
…………………..
राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी, युवा वर्ग, महिला, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, गरीब जनता या साऱ्यांचा विचार करुन सादर केला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण हा जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात मुलींचा टक्का वाढणार आहे असे महाडिक म्हणाले.