+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्रयाग चिखली उपसरपंचपदी शारदा कांबळे adjust काँग्रेसची यादी, ऋतुराज पाटील, राहुल पाटील, राजू आवळेंचा समावेश ! विश्वजीत कदम, विक्रम सावंताची उमेदवारी !! adjustशरद पवार गटातर्फे इस्लामपुरातून जयंत पाटील, कागलमध्ये समरजित, तासगावात रोहित पाटील ! चंदगड, इचलकरंजी वेटिंगवर !! adjustचार विद्यमान-तीन माजी आमदारासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनाने भरली रंगत adjust वेस्ट झोन शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत पृथ्वीराज महाडिकांचा सुवर्णवेध adjustआमची बांधिलकी शेतकऱ्यांशी, चिंताही शेतकऱ्यांचीच ! सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे-हसन मुश्रीफांचा पलटवार adjustहातकणंगलेतील शिक्षकांच्या कामाचा वेळेत निपटारा-गटशिक्षणाधिकाऱ्यांची पुरोगामीला ग्वाही adjustअभिषेक मिठारींकडून शरण साहित्य अध्यासनास अकरा हजार रुपयांची देणगी adjustकागलमधून समरजितसिंह घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल adjustमहाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे किंवा राजेश लाटकर
1001157259
1001130166
1000995296
schedule24 Oct 24 person by visibility 79 categoryराजकीय
नवोदिता घाटगे यांनीही भरला उमेदवारी अर्ज
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे या दोघांनीही उमेदवारी अर्ज आज गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सकाळी पावणे अकरा वाजता सादर केले
  तसेच राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील, रमेश माळी,  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, काँग्रेसचे सागर कोंडेकर, अखिलेशराजे घाटगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर सौ. घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, धैर्यशिल इंगळे, डोंगरी विकास समिती सदस्या विजया निंबाळकर यांची उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गैबी चौक ते कागल बसस्थानक पर्यंत रॅली काढणत आली.  यामध्ये महाविकास आघाडीचा विजय असो, एकच वस्ताद शरद पवार, समरजीीतसिंह घाटगे आगे बढो हम तुम्हारे साथ है, ह डर जरुरी है अशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीमध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय होती. तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.