+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्रयाग चिखली उपसरपंचपदी शारदा कांबळे adjust काँग्रेसची यादी, ऋतुराज पाटील, राहुल पाटील, राजू आवळेंचा समावेश ! विश्वजीत कदम, विक्रम सावंताची उमेदवारी !! adjustशरद पवार गटातर्फे इस्लामपुरातून जयंत पाटील, कागलमध्ये समरजित, तासगावात रोहित पाटील ! चंदगड, इचलकरंजी वेटिंगवर !! adjustचार विद्यमान-तीन माजी आमदारासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनाने भरली रंगत adjust वेस्ट झोन शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत पृथ्वीराज महाडिकांचा सुवर्णवेध adjustआमची बांधिलकी शेतकऱ्यांशी, चिंताही शेतकऱ्यांचीच ! सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे-हसन मुश्रीफांचा पलटवार adjustहातकणंगलेतील शिक्षकांच्या कामाचा वेळेत निपटारा-गटशिक्षणाधिकाऱ्यांची पुरोगामीला ग्वाही adjustअभिषेक मिठारींकडून शरण साहित्य अध्यासनास अकरा हजार रुपयांची देणगी adjustकागलमधून समरजितसिंह घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल adjustमहाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे किंवा राजेश लाटकर
1001157259
1001130166
1000995296
schedule24 Oct 24 person by visibility 95 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याती दहा विधानसभा मतदारसंघात गुरुपुष्यामृतची वेळ साधत २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.  महायुती व महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केले. शिवाय काही मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरीचे चिन्हे दिसत आहेत. कोल्हापूर उत्तर व हातकणंगले मतदारसंघातून गुरुवारी एकही अर्ज दाखल नाही.  
  चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून संग्रामसिंह भाग्येशराव कुपेर, प्रकाश रामचंद्र रेडेकर यांनी अपक्ष अर्ज भरले. राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीतंर्गत शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार के. पी. पाटील यांनी अर्ज भरला. केपी यांचे पुत्र व गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. कागल मतदारसंघात महाविकास आघाडीतंर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांनी तर अपक्ष म्हणून त्यांच्या पत्नी नवोदिता समरजितसिंह घाटगे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. 
 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार  ऋतुराज संजय पाटील यांनी अर्ज भरला.  तर पूजा ऋतुराज पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. महायुतीतंर्गत  भारतीय जनता पक्षातर्फे अमल महाडिक यांनी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिका यांनीही भाजपतर्फे अर्ज भरला.तर अपक्ष म्हणून सागर राजेंद्र कुंभार, संतोष गणपती बिसुरे, वसंत जिवबा पाटील यांनी अर्ज दाखल केला. 
करवीर मतदारसंघात महाविकास आघाडीतंर्गत काँग्रेसतर्फे राहुल पांडूरंग पाटील, तेजस्विनी राहुल पाटील यांनी अअर्ज भरला. जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे संताजी फत्तेसिंहराव घोरपडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे. शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व विद्यमान आमदार विनय विलासराव कोरे यांचा अर्ज आहे. या मतदारसंघात पारंपरिक लढत स्पष्ट आहे. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला. 
 हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाकडून राहुल प्रकाश आवाडे यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. आमदार प्रकाश आवाडे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल आहे. सचिन शिवाजी आठवले यांनी अपक्ष म्हणून अर्ज आहे. शिरोळ मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेंद्र शामगोंडा  पाटील यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीतर्फे अर्ज दाखल केला आहे.