+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्रयाग चिखली उपसरपंचपदी शारदा कांबळे adjust काँग्रेसची यादी, ऋतुराज पाटील, राहुल पाटील, राजू आवळेंचा समावेश ! विश्वजीत कदम, विक्रम सावंताची उमेदवारी !! adjustशरद पवार गटातर्फे इस्लामपुरातून जयंत पाटील, कागलमध्ये समरजित, तासगावात रोहित पाटील ! चंदगड, इचलकरंजी वेटिंगवर !! adjustचार विद्यमान-तीन माजी आमदारासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनाने भरली रंगत adjust वेस्ट झोन शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत पृथ्वीराज महाडिकांचा सुवर्णवेध adjustआमची बांधिलकी शेतकऱ्यांशी, चिंताही शेतकऱ्यांचीच ! सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे-हसन मुश्रीफांचा पलटवार adjustहातकणंगलेतील शिक्षकांच्या कामाचा वेळेत निपटारा-गटशिक्षणाधिकाऱ्यांची पुरोगामीला ग्वाही adjustअभिषेक मिठारींकडून शरण साहित्य अध्यासनास अकरा हजार रुपयांची देणगी adjustकागलमधून समरजितसिंह घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल adjustमहाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे किंवा राजेश लाटकर
1001157259
1001130166
1000995296
schedule24 Oct 24 person by visibility 44 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आमदार सतेज  पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या नोटिफिकेशनवर त्यांच्या बालिश बुद्धीचे प्रदर्शन केले आहे. याबाबतची त्यांची वक्तव्येही पोरकटपणाचीच आहेत, असा समाचार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. बालिश व पोरकटपणाची वक्तव्ये करून त्यांनी लोकांच्यात विनाकारण संभ्रम निर्माण करू नये अशी माझी त्यांना सूचना आहे, असेही  मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 
 मुश्रीफ यांनी म्हटले आहे,  शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या नोटिफिकेशनच्या सर्व प्रती माजी आमदार संजय घाटगे यांनी पत्रकारांना दिलेल्या आहेत. त्या नोटिफिकेशनच्या सर्वच प्रति मी,  आमदार सतेज पाटील यांना पाठवून दिल्या आहेत. खरंतर सतेज पाटील यांना आमदार आणि मंत्री म्हणून अनेक वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांनी त्याची शहानिशा करावी आणि स्वतःची खात्री करून घ्यावी. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन प्रक्रियेचा तारखांसह तपशीलही सोबत देत आहे. 
मुश्रीफ यांनी म्हटले आहे,  १५ ऑक्टोबरचा निर्णय सांगायला २३ तारीख का लागली यासह कोल्हापुरातून गोव्याला कसे जायचे, असे प्रश्न त्यानी उपस्थित केले आहेत. असले बालिश आणि पोरकटपणाचे प्रश्न त्यांनी करू नयेत. आम्ही शेतकऱ्यांना सांगितले होते की, कोल्हापूर जिल्ह्यात हा रस्ता होऊ देणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द करणे ही आमची शेतक-यांशी बांधिलकी आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग आणि रद्द केलेला आहे, यापुढे तो कधीही होऊ देणार नाही. इतर जिल्ह्यात ज्यांना हा रस्ता नको असेल तिथले लोक तो विषय बघतील.
 ..........
त्यांना चिंता गोव्याची.......!
मुश्रीफ यांनी म्हटले आहे, कोल्हापूर जिल्ह्यात आम्हाला हा रस्ता नको आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यापुरता तो रद्द झाला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली हे वाक्य वापरण्यापूर्वी त्यांनी शंभरवेळा विचार करायला हवा होता. तसेच; हसन मुश्रीफ असे करू शकतात काय, याबाबतही विचार करायला हवा होता. कारण; आम्हाला चिंता आहे शेतकऱ्यांची तर त्यांना चिंता गोव्याला जाणाऱ्यांची, असा चिमटाही मुश्रीफ यांनी काढला आहे.
===========