+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्रयाग चिखली उपसरपंचपदी शारदा कांबळे adjust काँग्रेसची यादी, ऋतुराज पाटील, राहुल पाटील, राजू आवळेंचा समावेश ! विश्वजीत कदम, विक्रम सावंताची उमेदवारी !! adjustशरद पवार गटातर्फे इस्लामपुरातून जयंत पाटील, कागलमध्ये समरजित, तासगावात रोहित पाटील ! चंदगड, इचलकरंजी वेटिंगवर !! adjustचार विद्यमान-तीन माजी आमदारासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनाने भरली रंगत adjust वेस्ट झोन शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत पृथ्वीराज महाडिकांचा सुवर्णवेध adjustआमची बांधिलकी शेतकऱ्यांशी, चिंताही शेतकऱ्यांचीच ! सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे-हसन मुश्रीफांचा पलटवार adjustहातकणंगलेतील शिक्षकांच्या कामाचा वेळेत निपटारा-गटशिक्षणाधिकाऱ्यांची पुरोगामीला ग्वाही adjustअभिषेक मिठारींकडून शरण साहित्य अध्यासनास अकरा हजार रुपयांची देणगी adjustकागलमधून समरजितसिंह घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल adjustमहाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे किंवा राजेश लाटकर
1001157259
1001130166
1000995296
schedule24 Oct 24 person by visibility 39 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये इस्लामपूर येथून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बारामतीमधून युगेंद्र पवार, तासगाव-कवठेमहांकाळ येथून रोहित पाटील तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघातून शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांची उमेदवारी घोषित झाली. तर चंदगड आणि इचलकरंजी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारांची घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र शरद पवार गटाकडून जाहीर झालेल्या पहिल्या यादीत इचलकरंजी आणि चंदगडमधील उमेदवारी जाहीर झाली नाही. यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीविषयी सस्पेन्स वाढला.
  राष्ट्रवादीतर्फे चंदगड मतदारसंघातून नंदिनी बाभूळकर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील काही स्थानि्क नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. यावरुन शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधत राष्ट्रवादीचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला ? असा सवाल केला होता. इचलकरंजीतूनही राष्ट्रवादीकडून मदन कारंडे यांच्या नावाची चर्चा आहे.
महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार कागल, चंदगड आणि इचलकरंजी हे मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. कागलमधून समरजितसिंह घाटगे यांची उमेदवारी जाहीर झाली. अन्य मतदारसंघाबाबत सस्पेन्स कायम राहिला.दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची दुसरी यादी दोन दिवसात जाहीर होईल असे म्हटले आहे. यामुळे दुसऱ्या यादीकडे नजरला गल्या आहेत.
……………….
राष्ट्रवादीचे अन्य उमेदवार पुढीलप्रमाणे….
काटोलमधून् माजी मंत्री अनिल देशमुख, घनसावंगीमधून माजी मंत्री राजेश टोपे, कळवा-मुंब्रातून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कर्जत जामखेडमधून रोहित पवार, कोरेगावमधून शशिकांत शिंदे, वसमतमधून जयप्रकाश दांडेगावकर, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देवकर, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे, शिरुरमधून अशोक पवार, शिराळामधून मानसिंगराव नाईक, विक्रमगडमधून सुनील भुसारा, अहमदपूरमधून विनायकराव पाटील उदगीरमधून सुधाकर भालेराव, सिंदखेडराजामधून डॉ. राजेंद्र शिंगणे, भोकरदनमधुन चंद्रकांत दानवे, तुमसर येथून चरण वाघमारे, किनवटमधून प्रदीप नाईक, जिंतूरम्धून विजय भांबळे, केजमधून पृथ्वीराज साठे, बेलापूरमधून संदीप नाईक, वडगाव शेरीतून बापूसाहेब पठारे, जामनेरमधून दिलीप खोडपे, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, मूर्तिजापूर सम्राट डोंगरदिवे, नागपूर पूर्वमधून दुनेश्वर पेठे, तिरोडामधून रविकांत बोपचे, अहेरीतून भाग्यश्री आत्राम, बदनापूरमधून रुपकुमार चौधरी, मुरबाड येथून सुभाष पवार, घाटकोपर पूर्व येथून राखी जाधव, आंबेगावमधून देवदत्त निकम, कोपरगावमधून संदीप वर्पे, शेवगावमधून प्रताप ढाकणे, पारनेरमधून राणी लंके, आष्टीतून मेहबुब शेख, करमाळा येथून नारायण पाटील, सोलापूर उत्तर येथून महेश कोठे, चिपळूण येथून प्रशांत यादव, हडपसरमधून प्रशांत जगताप यांची उमेदवारी आहे.