+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्रयाग चिखली उपसरपंचपदी शारदा कांबळे adjust काँग्रेसची यादी, ऋतुराज पाटील, राहुल पाटील, राजू आवळेंचा समावेश ! विश्वजीत कदम, विक्रम सावंताची उमेदवारी !! adjustशरद पवार गटातर्फे इस्लामपुरातून जयंत पाटील, कागलमध्ये समरजित, तासगावात रोहित पाटील ! चंदगड, इचलकरंजी वेटिंगवर !! adjustचार विद्यमान-तीन माजी आमदारासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनाने भरली रंगत adjust वेस्ट झोन शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत पृथ्वीराज महाडिकांचा सुवर्णवेध adjustआमची बांधिलकी शेतकऱ्यांशी, चिंताही शेतकऱ्यांचीच ! सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे-हसन मुश्रीफांचा पलटवार adjustहातकणंगलेतील शिक्षकांच्या कामाचा वेळेत निपटारा-गटशिक्षणाधिकाऱ्यांची पुरोगामीला ग्वाही adjustअभिषेक मिठारींकडून शरण साहित्य अध्यासनास अकरा हजार रुपयांची देणगी adjustकागलमधून समरजितसिंह घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल adjustमहाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे किंवा राजेश लाटकर
1001157259
1001130166
1000995296
schedule24 Oct 24 person by visibility 1197 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचा विजय असो, महायुतीचा विजय असो, अमल महाडिक आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाडिक -महाडिक धूमधडाका अशा घोषणा, कमळ चिन्हाच्या प्रतिकृती असलेल्या टोप्या परिधान केलेले हजारो कार्यकर्ते, हलगीचा कडकडाट आणि पारंपारिक वाद्यांचा गजर अशा उत्साही वातावरणामध्ये महायुतीचे कोल्हापूर दक्षिण मधील उमेदवार अमल महाडिक यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नागाळा पार्क येथील भाजपच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
 उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने महायुतीने शक्तिप्रदर्शन केले. भाजप, शिवसेना शिंदे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, आरपीआय यांच्यासह महायुतीतील समाविष्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी गर्दी होती. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात झालेल्या संवाद सभेत सर्वच नेत्यांनी यंदा कोल्हापूर दक्षिण मतदार संघामध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. खासदार धनंजय महाडिक, उमेदवार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास यांची भाषणे झाली.
 यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव, शहराध्यक्ष रूपाराणी निकम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, राजाराम कारखान्याचे संचालक शिवाजी पाटीलतानाजी पाटील, प्रताप पाटील कवडेकर,  माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, महेश सावंत, आशिष ढवळे, मुरलीधर जाधव, राजसिंह शेळके अजित ठाणेकर, उत्तम कोराने, प्रकाश गवंडी, किरण नकाते, भगवान काटे, वैभव माने, दिलीप मैत्रानी गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव, भाजपचे अशोक देसाई, डॉ. राजवर्धन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चौगुले,  संध्याराणी बेडगे, पंचायत समिती सदस्य रमेश चौगुले, सरिता कटेजा, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सुनील गाताडे, वळीवडेचे माजी सरपंच अनिल पंढरे, चिंचवडचे माजी सरपंच सुदर्शन उपाध्ये, युवाशक्ती अध्यक्ष बाहुबली पाटील , नागावचे माजी सरपंच अरुण माळी , करवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे आप्पासाहेब धनवडे, भाजपच्या संदीप लाड, विशाल शिराळकर, यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कोल्हापूर दक्षिणमधील विविध गावातील पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते. यामध्येह गांधीनगरचे माजी सरपंच रितू लालवानी, ग्रामपंचायत सदस्य रवी मालानी, अभिजीत अवघडे, अमित भटेजा, अविनाश पाटील,  पाचगावचे ग्रामपंचायत सदस्य सागर दळवी, महेश पाटील, स्वप्निल गाडगीळ, सागर गाडगीळ, सौरभ गाडगीळ अक्षय गाडगीळ अमोल गवळी सचिन पाटील आदींचा समावेश होता.