Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सारस्वत विकास मंडळाचा वीस एप्रिलला सुवर्ण महोत्सवी सोहळाविवेकानंद शिक्षण संस्था –एनआयआयटी फाऊंडेशनमध्ये सामज्यंस करारकोल्हापूरच्या सात जणांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीरगिरीष फोंडेवरील कारवाईच्या विरोधात गुरुवारी महापालिकेवर मूक मोर्चाशाहू स्टेडियमवर बुधवारपासून अटल चषक फुटबॉल स्पर्धेचा थरारपाण्याच्या टाक्यांची परस्पर विल्हेवाट, शाखा अभियंत्याविरोधात सीईओकडे तक्रारप्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश कोळी, उपाध्यक्षपदी पद्मजा मेढेसंजय घाटगे, अंबरिश घाटगेंच्या हाती कमळ ! मुंबईत झाला पक्षप्रवेश !!शिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण दिमाखातसंवेदनशीलतेच्या सावलीत उमललं नातं…! सत्यशोधकी पद्धतीने विवाह सोहळा !!

जाहिरात

 

सतेज पाटील क्रिकेट चषक स्पर्धेत शाहूपुरी जिमखाना, भिडे स्पोर्टस, अण्णा मोगणे संघाचे विजय

schedule07 Apr 25 person by visibility 81 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित क्रिकेट चषक स्पर्धेत शाहूपुरी जिमखाना ब संघ, भिडे स्पोर्टस व अण्णा मोगणे सहारा संघाने  प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवले. 

 शाहूपुरी जिमखाना (ब) संघाने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत सहा बाद १५२ धावा केल्या. त्यामध्ये  आदित्य देवल याने ३३ धावा केल्या. तर  प्रवीण चव्हाण याने ३० धावा, राहुल जावळे २६ धावा व धीरज पाटील याने २२ धावा केल्या. पॉप्युलर स्पोर्ट्स क्लबच्या रोहन परांजपे याने दोन विकेट घेतल्या तर प्रणव निगुडकर, ओम नावानुगल, निखिल हसुरे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. उत्तरादाखल खेळताना पॉप्युलर स्पोर्ट्स संघाचा डाव सर्वबाद १५० धावांवर आटोपला. त्यामध्ये  रोहित धुमाळ याने ४८  धावा व अजित अतिगरे याने नाबाद ३१ धावा केल्या. तर शाहूपुरी जिमखाना (ब) संघाने गोलंदाजी करताना डॉ. अभिजीत कोराणे तीन विकेट, ज्ञानेश कवडे दोन विकेट, राहुल जावळे दोन विकेट व आदित्य देवलने एक विकेट पटकावली.

 सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनने १४.५ षटकांत सर्वबाद १०२ धावा केल्या. त्यामध्ये  अजय बाटुंगेने २५ धावा केल्या. भिडे स्पोर्ट्स संघाच्या प्रणित कदमने चार विकेट, राजू मुल्लाने तीन विकेट व शरद पाटील, सतीश कुशवाह, सुधीर तोडकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. उत्तरादाखल भिडे स्पोर्ट्स संघाने १३.५ षटकांत १०५ धावा करत आपला विजय साकारला. सुधीर तोडकरने २७ व शुभम मगदूमने २६ धावा केल्या. सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनच्या साहिल पाटीलने तीन विकेट घेतल्या. तर दुसऱ्या सामन्यात कै. अण्णा मोगने (सहारा) संघाने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांत तीन बाद २८२ धावा केल्या. त्यामध्ये, अभिनंदन गायकवाडने नाबाद ११७ व महेश मस्के १०७, श्रेयस चव्हाण 3३ धावा केल्या. तर मंगलमूर्ती संघाने गोलंदाजी करताना मनोज, योगेश व विनोद सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. उत्तरादाखल मंगलमूर्ती संघ २८२ धावांचा पाठलाग करताना वीस षटकांत सहा बाद १५५ धावांवर आटोपला. वैभव नल्लवडेने ४५, सुरेश सातपुतेने ३४, राहुल मानेने 24 धावा केल्या. कै. आण्णा मोगने ( सहारा) संघाच्या श्रेयस चव्हाणने दोन  विकेट, विवेक मोरे, अतिश वरपे व सूरज कोंडाळकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes