सायबर महाविद्यालयामध्ये बुधवारी नोकरी महामेळावा
schedule07 Apr 25 person by visibility 166 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च, कोल्हापूर व क्यू .जे. पी. आर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, ९ एप्रिल सायबर महाविद्यालयांमध्ये नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता महामेळाव्याला सुरुवात होईल. नोकरी महामेळाव्याचे प्रायोजक डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन व प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे फाउंडेशन हे आहेत. आहे. महामेळाव्याचे उद्घाटन डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित राहणार आहेत. महामेळाव्यात विविध कंपन्यांचा सहभाग आहे.
उमेदवारांनी आपली नोंदणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून क्यूजेपीआर एप्लीकेशन डाऊनलोड करून नोंदणी करू शकता. सदर नोकरी महामेळाव्यामध्ये मध्ये जॉब ची संपूर्ण माहिती, स्वरूप व जबाबदारी, पगाराबद्दलची सविस्तर माहिती त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल्स, असणार आहेत अशी माहिती सायबर महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. भगवान पाटील यांनी दिली. सदर नोकरी महामेळाव्यास सर्व पदवीधर, पदवी तर पदवी प्राप्त उमेदवार त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण घेतलेले उमेदवार यांना नोकरीच्या मोठी संधी उपलब्ध असणार आहेत. मेळावा यशस्वी करण्यासाठी डायरेक्टर डॉ. बिंदू मेनन त्यांच्या सहकार्याने व सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न घेत आहेत.