संभाजी महाराजांची जयंती राष्ट्रीय धर्मवीर दिन म्हणून जाहीर करावी
schedule07 Apr 25 person by visibility 179 categoryसामाजिक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्यजित कदम यांची मागणी
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘हिंदवी स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, चौदा मे हा दिवस ‘राष्ट्रीय धर्मवीर दिन’ म्हणून जाहीर करावी अशी मागणी शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना कदम यांनी यासंबंधी निवेदन दिले. छत्रपती संभाजी महाराज यांचे राष्ट्र निर्माणातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या पराक्रमाचा, बलिदानाचा आणि धर्मनिष्ठेचा इतिहास तरुणांना प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या तेजस्वी जीवनकार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा यासाठी त्यांचा जन्मदिन हा ’राष्ट्रीय धर्मवीर दिन‘ म्हणून जाहीर करावा. त्यांच्या जयंतीला राष्ट्रीय दिनाचा दर्जा मिळाल्यास देशभरात त्यांच्या विचारांचा प्रसार होईल आणि प्रेरणादायी नेतृत्वाचे महत्व अधोरेखित होईल.’असे निवेदनात म्हटले आहे.