Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सारस्वत विकास मंडळाचा वीस एप्रिलला सुवर्ण महोत्सवी सोहळाविवेकानंद शिक्षण संस्था –एनआयआयटी फाऊंडेशनमध्ये सामज्यंस करारकोल्हापूरच्या सात जणांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीरगिरीष फोंडेवरील कारवाईच्या विरोधात गुरुवारी महापालिकेवर मूक मोर्चाशाहू स्टेडियमवर बुधवारपासून अटल चषक फुटबॉल स्पर्धेचा थरारपाण्याच्या टाक्यांची परस्पर विल्हेवाट, शाखा अभियंत्याविरोधात सीईओकडे तक्रारप्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश कोळी, उपाध्यक्षपदी पद्मजा मेढेसंजय घाटगे, अंबरिश घाटगेंच्या हाती कमळ ! मुंबईत झाला पक्षप्रवेश !!शिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण दिमाखातसंवेदनशीलतेच्या सावलीत उमललं नातं…! सत्यशोधकी पद्धतीने विवाह सोहळा !!

जाहिरात

 

सहज सेवा ट्रस्टतर्फे गायमुख येथे चार दिवस अन्नछत्र

schedule08 Apr 25 person by visibility 159 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जोतिबा यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सहज सेवा ट्रस्टतर्फे 10 ते 13 एप्रिल 2025 या कालावधीत गायमुख येथे अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे. सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्राचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे अशी माहिती ट्रस्टचे चिंतन शहा, मनीष पाटील व रोहित गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
 सहज सेवा ट्रस्ट सेवाभावी वृत्तीने गेली 25 वर्षे गायमुख येथे ज्योतिबा यात्रा कालावधीत अन्नक्षेत्र चालवते. या सेवाभावी उपक्रमासाठी समाजातील विविध घटकांचा हातभार लागतो. यंदा 10 ते 13 एप्रिल या कालावधीमध्ये अन्नक्षेत्र दिवस-रात्र सुरू राहणार आहे. साधारणपणे अडीच लाख भाविकांना अन्नछत्राचा लाभ मिळेल या पद्धतीने नियोजन केले आहे. अन्नछत्रांमध्ये यात्रेकरूंना जेवणासाठी पंधरा हजार चौरस फुटाचा मंडप उभारला आहे
 भाविकांना चहा व मठ्ठा देण्याची व्यवस्था आहे. याकरिता वेगळा मंडप उभारला आहे. यात्रेसाठी जे भाविक बैलगाडी घेऊन येतात त्यांच्या बैलांना शेंगदाणा पेंड व भुसा दिला जातो. अन्नछत्राच्या चार दिवसाच्या कालावधीत जवळपास चारशे स्वयंसेवक अहोरात्र काम करत असतात अन्नछत्राची संपूर्ण तयारी झाली आहे. गायमुख परिसरामध्ये यात्रेकरूंना वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता सरकारच्या आरोग्य विभागामार्फत 24 तास वैद्यकीय सेवा व एक रुग्णवाहिका उपलब्ध असेल. ज्या दानशूर व्यक्ती अथवा संस्थांना अन्नछत्रासाठी मदत करायचे आहे त्यांनी सहज सेवा ट्रस्ट,  स्टेट बँक कोषागार शाखा न्यू शाहूपुरी येथे संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे पत्रकार परिषदेला ट्रस्टचे सन्मती मिरजे, प्रमोद पाटील सूर्यकांत गायकवाड आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes